Lokmat Money >गुंतवणूक > अनिल अंबानींची मोठी झेप; या प्रकल्पात केली ₹10 हजार कोटींची गुंतवणूक, शेअर वधारले...

अनिल अंबानींची मोठी झेप; या प्रकल्पात केली ₹10 हजार कोटींची गुंतवणूक, शेअर वधारले...

Anil Ambani Plan: अनिल अंबानी त्यांच्या व्यवसायाला हळूहळू गती देत आहेत. यासाठी त्यांनी गेल्या एका वर्षात अनेक मोठी पावले उचलली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 14:54 IST2025-05-02T14:53:29+5:302025-05-02T14:54:20+5:30

Anil Ambani Plan: अनिल अंबानी त्यांच्या व्यवसायाला हळूहळू गती देत आहेत. यासाठी त्यांनी गेल्या एका वर्षात अनेक मोठी पावले उचलली आहेत.

Anil Ambani Investment: ₹10 thousand crores invested in this project, shares increased | अनिल अंबानींची मोठी झेप; या प्रकल्पात केली ₹10 हजार कोटींची गुंतवणूक, शेअर वधारले...

अनिल अंबानींची मोठी झेप; या प्रकल्पात केली ₹10 हजार कोटींची गुंतवणूक, शेअर वधारले...

Reliance Power Share Price: उद्योगपती अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरने देशात हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यांच्या रिलायन्स एनयू सनटेकने(Reliance NU Suntech), सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SECI) सोबत 25 वर्षांचा करार केला आहे. याअंतर्गत कंपनी 930 मेगावॅट सौर ऊर्जा आणि 465 मेगावॅट / 1,860  मेगावॅट बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (BESS) प्रदान करेल. हा आशियातील सर्वात मोठा सौर BESS प्रकल्प असेल.

10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
हा प्रकल्प रिलायन्स पॉवर पुढील 24 महिन्यांत पूर्ण करेल. यासाठी कंपनीकडून 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. या प्रकल्पातून वीज 3.53 रुपये प्रति किलोवॅट तास (kWh) दराने दिली जाईल. हा देशातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा हरित ऊर्जा करार आहे. कंपनी 930 मेगावॅट वीज पुरवण्यासाठी 1,700 मेगावॅटपेक्षा जास्त सौरऊर्जा क्षमता स्थापित करेल. त्यात आधुनिक बॅटरी स्टोरेज सिस्टीम देखील असेल, ज्यामुळे वीज पुरवठा स्थिर राहील.

लिलाव जिंकला
डिसेंबर 2024 मध्ये SECI च्या Tranche XVII लिलावात हा प्रकल्प रिलायन्स NU Suntech ला देण्यात आला. लिलावात रिलायन्सने सर्वाधिक 930 मेगावॅट सौर क्षमता आणि 456 मेगावॅट/1860 मेगावॅट BESS मिळवले. या लिलावात पाच मोठ्या वीज कंपन्यांनी भाग घेतला. रिलायन्स पॉवरने SECI ला 378 कोटी रुपयांची परफॉर्मन्स बँक गॅरंटी (PBG) दिली. लिलाव, निवाडा आणि कराराचे काम कंपनीने पाच महिन्यांत पूर्ण केले.

देशाच्या हरित ऊर्जेत महत्त्वाचे योगदान
कंपनीने एका निवेदनात म्हटले की, 'हा आमच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आम्ही देशात स्वच्छ ऊर्जेसाठी काम करण्यास वचनबद्ध आहोत. या प्रकल्पामुळे देशाचे अक्षय ऊर्जा लक्ष्य साध्य होण्यास मदत होईल. याशिवाय देशात ऊर्जा साठवणुकीची सुविधादेखील वाढेल. वीज निर्मितीव्यतिरिक्त, हा प्रकल्प ग्रीड स्थिर ठेवण्यास देखील मदत करेल. बॅटरी स्टोरेज सिस्टीमद्वारे गरज पडल्यास सौरऊर्जेचा वापर करता येतो.

रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये वाढ
10 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या बातम्या मीडियामध्ये आल्यानंतर अनिल अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी कंपनीचा शेअर 39.98 रुपयांवर बंद झाला. शुक्रवारी ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीला शेअर 40.75 रुपयांवर उघडला. ट्रेडिंग सत्रादरम्यान शेअरने ₹ 41.54 चा उच्चांक गाठला. शेअरमध्ये वाढ झाल्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप 16317 कोटी रुपयांपर्यंत वाढले.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)
 

Web Title: Anil Ambani Investment: ₹10 thousand crores invested in this project, shares increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.