Adani vs Pakistan: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्योगपती हर्ष गोएंका यांचे एक ट्विट आता व्हायरल होत आहे. गोयंका यांनी केलेल्या पोस्टमध्ये उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूहाच्या आर्थिक ताकदीची तुलना पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेशी केली आहे. फक्त एक भारतीय कंपनी संपूर्ण पाकिस्तानपेक्षा मोठी असल्याचे या पोस्टमध्ये गोएंका यांनी म्हटले आहे.
गोएंका यांच्या पोस्टमध्ये काय?
- कोहली विरुद्ध गल्लीतील क्रिकेटपटू
- इस्रो विरुद्ध पतंग
- शाहरुख खान विरुद्ध युट्यूब अभिनेता
- नाटू नाटू विरुद्ध शाळेचा डान्स
- सीएट विरुद्ध सायकल टायर शॉप
Just one Indian company. Bigger than an entire nation. And they dare to fight with us!
— Harsh Goenka (@hvgoenka) May 21, 2025
It’s like:
- Kohli vs a gully cricketer
- ISRO vs a kite
- Shahrukh Khan vs a YouTube actor
- Naatu Naatu vs a school dance
- CEAT vs a cycle tyre shop
A TOTAL MISMATCH pic.twitter.com/XrL8DISPHJ
हर्ष गोएंका यांनी वरील उदाहरणांसह पाकिस्तान आणि अदानी समुहाची तुलना केली आहे. पोस्टसोबत शेअर केलेल्या फोटोतही अदानी समूहाच्या व्यवसायाची पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची तुलना दाखवली आहे.
मार्केट कॅप: अदानी ग्रुपचे मार्केट कॅप $161 अब्ज असून, हे पाकिस्तानच्या $50 अब्जच्या तिप्पट आहे.
अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधा: अदानी 10.9 गिगावॅट क्षमतेचे काम करते, तर पाकिस्तानात 9-10 गिगावॅटचे काम होते.
ग्रीन हायड्रोजन: अदानींना ग्रीन हायड्रोजनमध्ये मोठा खेळाडू मानले जाते, तर पाकिस्तानने या क्षेत्रात कोणतेही मोठे पाऊल उचललेले नाही.
बंदरांचे कामकाज: अदानीकडे एकूण 627 मिलियन मेट्रिक टन (एमएमटी) क्षमतेची 15 बंदरे आहेत, तर पाकिस्तानकडे 185 एमएमटी क्षमतेची 3 बंदरे आहेत.
तुर्की आणि अझरबैजानवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन
गोयंका यांनी अशी टिप्पणी करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. अलिकडेच, त्यांनी भारतीय नागरिकांना तुर्की आणि अझरबैजानवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर या दोन्ही देशांनी पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला होता.