मुंबई: सध्या ट्विटरवर १९००० आकडा ट्रेंडमध्ये आहे. सकाळपासून १९०० रुपये ट्विटरवर ट्रेंडमध्ये दिसत आहे. दोन ई-कॉमर्स कंपन्यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कमाईमुळे ट्विटरवर १९००० रुपये ट्रेंडिंग आहेत. काही दिवसांपूर्वीच फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉननं सेल आयोजित केला होता. विशेष म्हणजे देशात आर्थिक मंदीसदृश्य स्थिती असताना फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉननं सेलमधून कोट्यवधी रुपयांची कमाई केली. 
फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉननं २९ सप्टेंबरपासून सहा दिवसांचा सेल आयोजित केला होता. यामधून या दोन्ही कंपन्यांनी १९ हजार कोटी रुपयांच्या उत्पादनांची विक्री केली. विशेष म्हणजे भारतात सुरू झालेल्या फ्लिपकार्टचा यामधील वाटा ६० टक्के आहे. मोबाईल विभागात मुसंडी मारल्यानं फ्लिपकार्टला यश मिळाल्याचं रेडसीरनं या सल्लागार संस्थेनं म्हटलं आहे. मोबाईलवर देण्यात आलेली सवलती, ईएमआयचे विविध पर्याय आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेल्या आक्रमक जाहिराती यामुळे फ्लिपकार्टला उत्तम प्रतिसाद मिळाला, असं विश्लेषण रेडसीरकडून करण्यात आलं आहे. 
जेफ बेझोस यांच्या मालकीची अॅमेझॉन मात्र फ्लिपकार्टच्या तुलनेत मागे पडली. ई-कॉमर्स कंपन्यांनी केलेल्या एकूण विक्रीचा विचार केल्यास त्यातील अॅमेझॉनचा वाटा २८ टक्के इतका आहे. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉननं मिळून एकूण ९० टक्के उत्पादनांची विक्री केली आहे. त्यामुळे देशातील ऑनलाईन बाजारपेठेत आता दोनच मुख्य स्पर्धक राहिल्याचं स्पष्ट झालं आहे. पूर्वी या दोन कंपन्यांशी स्पर्धा करणारी स्नॅपडिल आता पूर्णपणे मागे पडली आहे. 
 
...म्हणून ट्विटरवर 19,000 ट्रेंडमध्ये; जाणून घ्या कारण
सकाळपासून Rs 19,000 ट्रेंडिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 12:00 IST2019-10-09T11:56:01+5:302019-10-09T12:00:43+5:30
सकाळपासून Rs 19,000 ट्रेंडिंग
