Recession diamond industry : Sawaji Dholkia will not give cars his employees this year | हिरा उद्योगावर मंदीची मार, सावजी ढोलकिया या दिवाळीला कर्मचाऱ्यांना देणार नाहीत कार 
हिरा उद्योगावर मंदीची मार, सावजी ढोलकिया या दिवाळीला कर्मचाऱ्यांना देणार नाहीत कार 

ठळक मुद्देबाजारात आलेल्या सुस्तीचा फटका हिरा व्यापारालाही बसला आहेसुमारे पाच लाख कामगारांना यंदाच्या दिवाळीत बोनस आणि अन्य लाभांपासून वंचित राहावे लागण्याची शक्यतादिवाळीत कामगारांना  भेट म्हणून कार, दागिने आणि घर देण्यासाठी प्रसिद्ध असलेले हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांच्या व्यवसायालाही मंदीचा फटका

सूरत - बाजारात आलेल्या सुस्तीचा फटका हिरा व्यापारालाही बसला आहे. व्यवसाय मंदावल्याने हिऱ्यांचे शहर म्हणून ओळख असलेल्या सूरतमधील हिरा व्यापाराची चमकसुद्धा फिकी पडली आहे. त्यामुळे सुमारे पाच लाख कामगारांना यंदाच्या दिवाळीत बोनस आणि अन्य लाभांपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. दरवर्षी दिवाळीत कामगारांना  भेट म्हणून कार, दागिने आणि घर देण्यासाठी प्रसिद्ध असलेले हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांच्या व्यवसायालाही मंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांनी यावेळच्या दिवाळीत कामगारांना देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंबाबत हात आखडता घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

याबाबत विचारणा केली असता सावजी ढोलकिया म्हणाले की, ''यावर्षी आलेली मंदी ही 2008 मध्ये आलेल्या मंदीपेक्षा गंभीर आहे. आता पूर्ण उद्योगच मंदीची शिकार झाला असेल तर भेटवस्तूंच्या खर्चाचा भार आम्ही कसा काय उचलू शकतो. सध्या आम्हाला हिरे उद्योगात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेबाबत चिंतीत आहोत. गेल्या सात महिन्यांमध्ये  हिरे उद्योगातून सुमारे 40 हजार लोकांचा रोजगार हिरावला गेला आहे. तसेच जे काम करत आहे त्यांच्या वेतनामध्येसुद्धा सुमारे 40 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. 
मंदीच्या परिस्थितीमध्ये ज्या कंपन्या काम करत आहेत. त्यांना आपले काम कमी करणे  भाग पडत आहे. यावर्षी हिरे व्यवसायातील दिग्गज कंपनी असलेल्या डी बीयर्सलाही आपले उप्तादन घटवावे लागले आहे. 

सावजी ढोलकिया हे आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीला कार, घर आदी भेट म्हणून देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ढोलकिया 2011 पासून प्रत्येक वर्षी आपल्याकडी कर्मचाऱ्यांना अशा उंची भेटवस्तू बोनस म्हणून देत आले आहेत. गेल्यावर्षीही त्यांनी आपल्याकडील 600 कर्मचाऱ्यांना कार भेट म्हणून दिली होती. तर 900 कर्मचाऱ्यांना एफडी दिली होती. मात्र दिवाळीला कर्मचाऱ्यांना मोठ्या भेटवस्तू देण्याची त्यांची परंपरा यावर्षी खंडित होणार आहे. 

Web Title: Recession diamond industry : Sawaji Dholkia will not give cars his employees this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.