Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार

मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार

ration card e kyc : रेशन कार्डचा लाभ घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्हीही मोफत रेशनचा लाभ घेत असाल आणि तुम्ही हे काम अजून केले नसेल, तर तुमचे नाव वगळले जाईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 12:36 IST2025-04-29T12:24:03+5:302025-04-29T12:36:44+5:30

ration card e kyc : रेशन कार्डचा लाभ घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्हीही मोफत रेशनचा लाभ घेत असाल आणि तुम्ही हे काम अजून केले नसेल, तर तुमचे नाव वगळले जाईल.

ration card e kyc deadline for free april 30 last date for holders | मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार

मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार

ration card e kyc : तुम्हीही रेशन कार्डवर मोफत धान्य आणि इतर लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. रेशनकार्डधारकांना उद्यापर्यंत त्यांचे ई-केवायसी पूर्ण करावे लागणार आहे. तुमच्याकडे फक्त एक दिवसाचा वेळ आहे, जर तुम्ही ३० एप्रिलपर्यंत ई-केवायसी पूर्ण केले नाही तर तुम्हाला मोफत रेशन मिळणार नाही. यापूर्वी शेवटची तारीख ३० मार्च होती. सरकारने आतापर्यंत सहावेळा आपली अंतिम मुदत वाढवली आहे. पण यावेळी सरकारने म्हटले आहे की कोणत्याही परिस्थितीत ई-केवायसी ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करावे लागेल. अन्यथा, तुमचे नाव वगळले जाईल. ज्यांनी ई-केवायसी केले नाही त्यांची नावे बनावट युनिट्स म्हणून समजून वगळली जातील. म्हणून, तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी शक्य तितक्या लवकर ई-केवायसी करा. हे काम तुम्ही मोबाईलवरुनही करू शकता.

घरबसल्या ई-केवायसी कसे करावे?
यासाठी तुम्हाला 'मेरा ई-केवायसी' हे प्ले स्टोअरवरील अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. यासोबत आधार फेस आरडी देखील डाउनलोड करा. सर्वप्रथम अ‍ॅप उघडा, तुमचे लोकेशन टाका, नंतर तुमचा आधार क्रमांक, कॅप्चा टाका आणि नंतर ओटीपी प्रविष्ट करा. तुम्हाला तुमचे सर्व तपशील स्क्रीनवर दिसतील आणि त्यानंतर फेस ई-केवायसी पर्याय निवडा. यानंतर, कॅमेरा चालू करा, फोटोवर क्लिक करा आणि तो सबमिट करा. अशा प्रकारे, तुमचे ई-केवायसी घरी बसून पूर्ण होईल.

वाचा - अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट

तुमच्या राज्याच्या सार्वजनिक वितरण प्रणालीच्या वेबसाइटला भेट द्या. तेथे रेशन कार्डसाठी ई-केवायसी वर क्लिक करा, त्यानंतर रेशन कार्ड क्रमांक आणि आधार क्रमांक टाका. कुटुंबप्रमुखाचा आधार क्रमांक एंटर करा, त्यानंतर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, सर्व माहिती एंटर करा आणि सबमिट करा. बनावट रेशनकार्ड असलेल्या लोकांना सिस्टममधून काढून टाकण्यासाठी नागरिकांना केवायसी करण्यास सांगितले जात आहे. मोफत रेशनचा फायदा गरजू लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सरकारने ही मोहीम सुरू केली आहे.

Web Title: ration card e kyc deadline for free april 30 last date for holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.