The rate of limbs in Srigonda falls from 30 rupees to 8 rupees per kg, before the onset of cold. | श्रीगोंद्यात लिंबांचे दर ३० रुपयांवरून ८ रुपये किलो, थंडी सुरू होण्यापूर्वीच झाली दरात घसरण
श्रीगोंद्यात लिंबांचे दर ३० रुपयांवरून ८ रुपये किलो, थंडी सुरू होण्यापूर्वीच झाली दरात घसरण

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : थंडी सुरू होण्यापूर्वीच लिंबाचे भाव ३० रुपये किलोवरुन थेट आठ रुपये किलोपर्यंत खाली घसरले आहेत. दररोज ३०० मेट्रिक टन लिंबाचे उत्पादन होत आहे. मात्र भाव घसरल्याने लिंबू उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
सध्या उत्तर भारतातील बाजारपेठेत लिंबू २० रुपये किलो आहे. पण वाहतुकीचा खर्च परवडत नसल्याने व्यापाऱ्यांनी लोणचे बनविणाºया कंपन्यांना लिंबू देण्यास सुरुवात केली आहे.
लिंबाच्या व्यापारावर बाजार समितीचे लक्ष आहे. पण बाजारपेठेत मंदी आहे. तरी शेतकऱ्यांच्या लिंबाला चांगला भाव देण्यासाठी व्यापाºयाची बैठक घेऊन सूचना देण्यात येतील, अशी माहिती बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते यांनी दिली.

शेतकºयांनी टँकरने पाणी घालून दुष्काळात लिंबोणीच्या बागा जगविल्या आहेत. अनेक बागा दुष्काळाच्या वनव्यात गेल्या. त्यामुळे लिंबू शेतीला चांगले दिवस येतील अशी आशा होती. पण लिंबाचे भाव कोसळले आहेत.
-किसन बोरुडे,
शेतकरी, श्रीगोंदा.

उत्तर भारतातील लिंबाचे भाव ४० रुपये किलोच्या वर गेले आहेत. वाहतूक खर्च जाऊन शेतकºयांना ३० रुपये किलोचा भाव देता येतो. पण सध्या लिंबाला बाजारपेठेत मागणी नसल्याने लोणचे कंपन्यांना लिंबू द्यावे लागते. लिंबू व्यापार ना नफा ना तोटा तत्त्वावर करावा लागत आहे.
-आदिनाथ वांगणे,
लिंबू व्यापारी, श्रीगोंदा

Web Title: The rate of limbs in Srigonda falls from 30 rupees to 8 rupees per kg, before the onset of cold.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.