lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bank : चार बँकांपैकी दोन बँकांचे खासगीकरण; बुधवारी बैठक

Bank : चार बँकांपैकी दोन बँकांचे खासगीकरण; बुधवारी बैठक

Bank : चार बँकांपैकी दोन बँकांचे खासगीकरण हे चालू आर्थिक वर्षामध्ये होणार असून, अन्य दोन बँकांचा नंबर पुढच्या टप्प्यात लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 01:00 AM2021-04-12T01:00:52+5:302021-04-12T01:01:11+5:30

Bank : चार बँकांपैकी दोन बँकांचे खासगीकरण हे चालू आर्थिक वर्षामध्ये होणार असून, अन्य दोन बँकांचा नंबर पुढच्या टप्प्यात लागेल.

Privatization of two of the four banks; Wednesday meeting | Bank : चार बँकांपैकी दोन बँकांचे खासगीकरण; बुधवारी बैठक

Bank : चार बँकांपैकी दोन बँकांचे खासगीकरण; बुधवारी बैठक

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील चार बँकांचे खासगीकरण करताना ते टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. याबाबत एक बैठक बुधवार, दि.१४ रोजी बोलाविण्यात आली असून, त्यामध्ये याबाबतच्या निर्णयाची शक्यता आहे. 
चार बँकांपैकी दोन बँकांचे खासगीकरण हे चालू आर्थिक वर्षामध्ये होणार असून, अन्य दोन बँकांचा नंबर पुढच्या टप्प्यात लागेल. याबाबत भारतीय रिझर्व्ह बँक, नीती आयोग आणि अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक येत्या बुधवारी बोलावण्यात आली आहे. त्यामध्ये पहिल्या दोन बँका कोणत्या ते ठरण्याची शक्यता आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या चार बँकांचे खासगीकरण करण्याचा सरकारचा विचार आहे.

Web Title: Privatization of two of the four banks; Wednesday meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक