पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना जारी केला अलर्ट, लक्ष न दिल्यास होऊ शकतं मोठं नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 04:00 PM2021-07-29T16:00:14+5:302021-07-29T16:00:52+5:30

PNB issues alert to customers: पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना बँकिंग फसवणुकीबाबत एक अलर्ट जारी करून फिशिग घोटाळ्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

PNB issues alert to customers | पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना जारी केला अलर्ट, लक्ष न दिल्यास होऊ शकतं मोठं नुकसान 

पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना जारी केला अलर्ट, लक्ष न दिल्यास होऊ शकतं मोठं नुकसान 

Next

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना बँकिंग फसवणुकीबाबत एक अलर्ट जारी करून फिशिग घोटाळ्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. देशभरातील बँका आपल्या ग्राहकांना कुठल्याही प्रकारच्या बँकिंग फ्रॉडपासून सावध करत आहेत. एसबीआयनंतर आता पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना बँकिंग फसवणुकीपासून सावध करण्यासाठी अलर्ट जारी केला आहे. (PNB issues alert to customers)

पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ट्विटर हँडलवर अनेक प्रकारच्या अलर्ट्सचा उल्लेख केला आहे. तसेच एक ट्विट जारी करून सावध राहण्यास सांगितले आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की, सोशल मीडियावरील फेक प्रोफाइलपासून सावध राहा. हँडलकडून खातरजमा करून घेतल्याशिवाय कुठलाही बाहेरचा सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नका. तसेच कुठल्याही प्रकारची वैयक्तिक माहिती कुणासोबत शेअर करू नका.

यापूर्वीही बँकेने एक अलर्ट जारी करून ग्राहकांना बनावट कॉलपासून सावध राहण्यास सांगितले होते. स्वत: बँक कर्मचारी असल्याचे सांगत काही लोक बनावट कॉल करून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. फोनवर ते बँक खात्यासंबंधीची भीती दाखवत त्यांच्याकडून माहिती घेत आहेत. तसेच त्यांच्या खात्यामधील पैसे उडवत आहेत. अशा परिस्थितीत बँकेच्या ग्राहकांनी कुणाच्याही फसवणुकीला बळी पडू नये यासाठी पंजाब नॅशनल बँकेने हा अलर्ट जारी केला आहे.

असा करा फ्रॉडपासून स्वत:चा बचाव
-OTP, PIN, CVV, UPI PIN शेअर करू नका
- फोनमध्ये कधीही बँकींग संदर्भातील माहिती सेव्ह करू नका
- एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डची माहिती शेअर करू नका
- बँक कधीही कुठलीही माहिती मागत नाही
-ऑनलाइन पेमेंट करताना सावधगिरी बाळगा
- तपासणी केल्याशिवाय सॉफ्टवेअर इंस्टॉल करू नका
- अनोळखी लिंक तपासून घ्या
- स्पायवेअरपासून सावध राहा 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: PNB issues alert to customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app