Lokmat Money > बिझनेस न्यूज > उत्पादन शुल्क वाढूनही पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, जाणून घ्या असे आहेत दर

उत्पादन शुल्क वाढूनही पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, जाणून घ्या असे आहेत दर

मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात 11 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे रविवारी मुंबईमध्ये प्रेट्रोल विकत घेण्यासाठी ग्राहकांना एक लिटर पेट्रोलसाठी 75.46 रुपये मोजावे लागतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 12:29 PM2020-03-15T12:29:50+5:302020-03-15T12:48:42+5:30

मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात 11 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे रविवारी मुंबईमध्ये प्रेट्रोल विकत घेण्यासाठी ग्राहकांना एक लिटर पेट्रोलसाठी 75.46 रुपये मोजावे लागतील.

petrol and diesel price declines significantly in india SNA | उत्पादन शुल्क वाढूनही पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, जाणून घ्या असे आहेत दर

उत्पादन शुल्क वाढूनही पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, जाणून घ्या असे आहेत दर

Highlightsराजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 12 पैशांनी कमी होऊन 69.75 रुपये प्रति लीटर मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात 11 पैशांची घट डिझेलच्या दरातही 14 पैशांची घसरण 

नवी दिल्ली - केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये प्रति लीटर तीन रुपयांची वाढ केली आहे. मात्र, असे असतानाही रविवारी दिल्लीसह संपूर्ण देशात इंधनाचे दर कमी झाल्याचे दिसून आले. पेट्रोलच्या दरात 12 पैशांची तर डिझेलच्या दरात 14 पैशांची घट झाली आहे. 

यानुसार आता राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 12 पैशांनी कमी होऊन 69.75 रुपये प्रति लीटर झाले आहे. तर डिझेलचे दर14 पैशांनी कमी होऊन 62.44 रुपये प्रिति लिटर झाला आहेत. जग भरात पसरत असलेल्या कोरोनाचा कच्च्या तेलाच्या किमतीवरही मोठा परिणाम झाला आहे. यामुळे भारतात पेट्रोन आणि डिझेलचे दर कमी झाल्याचे दिसत आहे.

मुंबईत असे आहेत पेट्रोल-डिझेलचे दर - 
मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात 11 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे रविवारी मुंबईमध्ये प्रेट्रोल विकत घेण्यासाठी ग्राहकांना एक लिटर पेट्रोलसाठी 75.46 रुपये मोजावे लागतील. याशिवाय डिझेलच्या दरातही 14 पैशांची घसरण झाल्याने डिझेलचे दर 65.37 रुपये प्रति लिटर झाले आहेत.

कोलकात्यात पेट्रोलच्या दरात 12 पैशांची घट झाली असून येथे पेट्रोलचे दर 72.45 रुपये झाले आहेत. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 12 पैशांनी स्वस्त होऊन 72.45 रुपये प्रती लिटर तर डिझेल 15 पैशांनी स्वस्त होऊन 65.87 रुपये प्रति लिटर झाले आहे.

उत्पादन शुल्कात करण्यात आली होती ३ रुपयांची वाढ

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात शनिवारी वाढ केली होती. यानुसार पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क ३ रुपयांनी वाढवण्यात आले होते. यामुळे इंधनाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात उत्पादन शुल्कात वाढ होऊनही पेट्रोलचे दर कमी झाले आहेत.

Web Title: petrol and diesel price declines significantly in india SNA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.