Paytm Cashback Offer: पेटीएम 100 कोटी रुपये वाटणार; जाणून घ्या तुम्ही कसे मिळवाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 10:19 PM2021-10-18T22:19:45+5:302021-10-18T22:20:38+5:30

Paytm Cashback Offer Diwali: पेटीएम युजर पैसै ट्रान्सफर करण्यासाठी पेटीएम युपीआय, पेटीएम वॉलेट, पेटीएम पोस्टपेड (बाय नाउ, पे लेटर) आदींसाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. हा फेस्टिव्हल 14 ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे.

Paytm Cashback Offer: Paytm will give up Rs 100 crore; see how to get ... | Paytm Cashback Offer: पेटीएम 100 कोटी रुपये वाटणार; जाणून घ्या तुम्ही कसे मिळवाल...

Paytm Cashback Offer: पेटीएम 100 कोटी रुपये वाटणार; जाणून घ्या तुम्ही कसे मिळवाल...

Next

नवी दिल्ली : पेटीएमने (Paytm) दिवाळीनिमित्त मोठी कॅशबॅक ऑफर आणली आहे. मार्केटिंगसाठी कंपनी 100 कोटी रुपयांची खैरात वाटणार आहे. हे कॅम्पेन डिजिटल पेमेंटला दिलासा देणारे आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

या काळात पेटीएम युजर पैसै ट्रान्सफर करण्यासाठी पेटीएम युपीआय, पेटीएम वॉलेट, पेटीएम पोस्टपेड (बाय नाउ, पे लेटर) आदींसाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. हा फेस्टिव्हल 14 ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. याचे नाव पेटीएम कैशबैक धमाकाअसे ठेवण्यात आले आहे. तुम्ही पैसे ट्रान्सफर, ऑनलाईन, ऑफलाईन पैसे देणे आदीवरून कॅशबॅक मिळवू शकता. यामागे ग्राहकांना पेटीएमकडे वळविणे हा कंपनीचा हेतू आहे. 

ही योजना पेटीएमच्या सर्व जिल्हा, तालुका स्तरावरील पार्टनर स्टोअर, रिटेल आऊटलेटसह ऑनलाईन प्लॅटफ़ॉर्मवरही सुरु केले जाणार आहे. गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना आणि कर्नाटकमध्ये जास्त लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. 14 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या काळात दररोज 10 विजेते 1 लाख रुपये जिंकणार आहेत. 10000 विजेत्यांना 100 रुपयांचा कॅशबॅक दिला जाणार आहे. तर तेवढ्याच ग्राहकांना 50 रुपयांचा कॅशबॅक दिला जाईल, असे कंपनीने सांगितले. दिवाळीत 1 ते 3 नोव्हेंबर या काळात युजर दिवसाला 10 लाख रुपये जिंकू शकतात. आयफोन 13, टी 20 वर्ल्ड कपचे तिकिट आदी बक्षीसे जिंकू शकणार आहेत. 

Web Title: Paytm Cashback Offer: Paytm will give up Rs 100 crore; see how to get ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app
टॅग्स :Paytmपे-टीएम