Lokmat Money > बिझनेस न्यूज > १०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट

१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट

फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम ही सोशल मेसेजिंग अॅप्सच्या दुनियेत प्रसिद्ध नावं आहेत. हे सर्व अॅप्स एकाच कंपनीकडे आहेत. म्हणजे एक प्रकारची मक्तेदारीच आहे. अशातच एखादं नवं अॅप येऊन जगभरातील मोबाइल फोनमध्ये आपले स्थान निर्माण करणं ही काही सामान्य गोष्ट नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 16:20 IST2025-06-23T16:15:26+5:302025-06-23T16:20:14+5:30

फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम ही सोशल मेसेजिंग अॅप्सच्या दुनियेत प्रसिद्ध नावं आहेत. हे सर्व अॅप्स एकाच कंपनीकडे आहेत. म्हणजे एक प्रकारची मक्तेदारीच आहे. अशातच एखादं नवं अॅप येऊन जगभरातील मोबाइल फोनमध्ये आपले स्थान निर्माण करणं ही काही सामान्य गोष्ट नाही.

pavel durov russian businessman is the father of 106 children gave 1100 crores to each of them but there was one condition | १०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट

१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट

फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम ही सोशल मेसेजिंग अॅप्सच्या दुनियेत प्रसिद्ध नावं आहेत. हे सर्व अॅप्स एकाच कंपनीकडे आहेत. म्हणजे एक प्रकारची मक्तेदारीच आहे. अशातच एखादं नवं अॅप येऊन जगभरातील मोबाइल फोनमध्ये आपले स्थान निर्माण करणं ही काही सामान्य गोष्ट नाही. पण रशियाच्या उद्योगपतीने ते करून दाखवलं. आम्ही ज्या मेसेजिंग अॅपबद्दल बोलत आहोत त्याचं नाव आहे टेलिग्राम (Telegram). याची स्थापना पावेल दुरोव्ह यांनी केली होती. पावेल यांनी २०१३ मध्ये आपला भाऊ निकोलाई दुरोव्ह सोबत मिळून या अॅपची सुरुवात केली. याआधीही त्यानं एक सोशल साईट तयार केली होती, पण २०१४ मध्ये ती सोडली. ही वेबसाईट रशियन सरकारनं ताब्यात घेतल्याचं दुरोव्ह बंधूंनी सांगितलं.

मात्र, पावेल दुरोव यांनी आपलं मुख्यालय दुबईला हलवलं आणि टेलिग्राममधून प्रचंड संपत्ती कमावली. आता त्यानं ही संपत्ती आपल्या १०० हून अधिक मुलांमध्ये वाटण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची एकूण संपत्ती आता १४ अब्ज डॉलर झाली आहे. त्यांना १०६ मुलं असल्याचं समजतं. म्हणजेच प्रत्येक मुलाला १३.२ कोटी डॉलर म्हणजेच ११४२ कोटी रुपये मिळतील. मात्र, त्यांच्या मुलांना हे पैसे ३० वर्षांनंतरच मिळतील, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

कसा बनला १०६ मुलांचा बाप

दुरोव्ह यांची सहा मुलं अशी आहेत ज्यांचे ते नैसर्गिक वडील आहे. त्यांना ही सहा मुलं तीन वेगवेगळ्या जोडीदारांसह झाली आहेत. याशिवाय, दुरोव्ह गेल्या १५ वर्षांपासून स्पर्म डोनेट करत आहेत. यातून त्यांना सुमारे १०० मुलं आहेत. ही मुलं १२ देशांमध्ये आहेत. "मी अलीकडेच माझे मृत्युपत्र लिहिलंय. मी माझ्या मुलांमध्ये फरक करत नाही. यामध्ये, अशी मुले आहेत जी नैसर्गिकरित्या माझ्यापासून थेट जन्माला आली आहेत आणि बाकीची ती आहेत जी माझ्या स्पर्म डोनेशनमधून जन्माला आली आहे. ती सर्व माझी मुले आहेत आणि सर्वांना समान हक्क मिळतील. मी गेल्यानंतर त्यांच्यात कोणतेही वाद व्हावे असं मला वाटत नाही. मला वाटतं की त्यांनी सामान्य जीवन जगावं, स्वतःला सिद्ध करावं, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकावं, काहीतरी कमावता यावं आणि कोणत्याही बँक खात्यावर अवलंबून राहू नये," असं दुरोव्ह यांनी एका फ्रेंच मासिक Le Point ला सांगितलं.

Web Title: pavel durov russian businessman is the father of 106 children gave 1100 crores to each of them but there was one condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.