डेटा संपलाय? 84 दिवसांसाठी मिळणार एकूण 168GB डेटा; 1GB ची किंमत केवळ 5 रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 05:45 PM2022-01-14T17:45:43+5:302022-01-14T17:46:06+5:30

अनेकदा आपल्याला अधिक डेटाची गरज भासत असते.

out of data A total of 168GB of data will be available for 84 days 1GB costs only Rs | डेटा संपलाय? 84 दिवसांसाठी मिळणार एकूण 168GB डेटा; 1GB ची किंमत केवळ 5 रुपये 

डेटा संपलाय? 84 दिवसांसाठी मिळणार एकूण 168GB डेटा; 1GB ची किंमत केवळ 5 रुपये 

Next

घरून काम करताना (Work From Home) किंवा ऑनलाइन अभ्यास करताना, काम संपण्यापूर्वी डेटा संपत असल्यास, तुम्हाला अधिक डेटा असलेल्या प्लॅनची गरज भासते. Vodafone Idea आणि Airtel दोन्ही कंपन्या 2GB दैनिक डेटा असलेले प्रीपेड प्लॅन सध्या 839 रुपयांमध्ये ऑफर करतात. प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतीच्या वाढीपूर्वी त्याच प्लॅनची ​​किंमत सुमारे 700 रुपये होती. एकाच वेळी 839 रुपये भरणे थोडेसे जड वाटेल, परंतु पाहिले तर त्याचा दररोजचा खर्च सुमारे 10 रुपये आहे.

Vi आणि Airtel दोन्ही कंपन्या त्यांच्या 839 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह 168GB डेटा ऑफर करतात. याचा अर्थ ग्राहकांना प्रत्येक जीबी डेटाची किंमत सुमारे 5 रुपये इतकी पडते. केवळ डेटाच नाही तर या प्लॅनसह, ग्राहकांना प्रत्यक्षात अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात.

एक्स्ट्रा बेनिफिट्सही 
दोन्ही टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी एक्स्ट्रा बेनिफिट्सदेखील देतात. Airtel ही कंपनी Airtel Thanks बेनिफिट्स ऑफर करते. यामध्ये अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ मोबाईल एडिशन (Amazon Prime Video Mobile Edition), विंक म्युझीक (Wynk Music), फास्टॅग (FASTag) कॅशबॅक, शॉ अकादमी, एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमिअम (Airtel Xstream Premium) आणि अन्य बेनिफिट्सही देण्यात येतात.

तर दुसरीकडे Vi आपल्या ग्राहकांना बिंज ऑल नाईट (Binge All Night), विकेंड डेटा रोलओव्हर (Weekend Data Rollover) आणि डेटा डिलाईट (Data Delights) सारखे अतिरिक्त फायदे ऑफर करते. व्होडाफोनआयडियाचा (Vodafone Idea) 839 रुपयांचा प्लॅन Vi Movies आणि TV Classic च्या OTT सबस्क्रिप्शनसह देखील येते. डेटा डिलाईट्स (Data Delights) ही प्रीपेड दरवाढीनंतर व्होडाफोनआयडियानं (Vodafone Idea) ने सादर केलेली एक नवीन ऑफर आहे. हे ग्राहकांना अतिरिक्त 2GB मासिक डेटा ऑफर करते जे दोनदा रिडिम केले जाऊ शकते.

Web Title: out of data A total of 168GB of data will be available for 84 days 1GB costs only Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app