... Otherwise Vodafone and Idea will have to shut down business, warns the Birla government | ...अन्यथा व्होडाफोन आणि आयडियाला व्यवसाय बंद करावा लागेल, बिर्लांचा सरकारला इशारा
...अन्यथा व्होडाफोन आणि आयडियाला व्यवसाय बंद करावा लागेल, बिर्लांचा सरकारला इशारा

मुंबईः व्होडाफोन आणि आयडिया या कंपनीला दिवसेंदिवस प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. करांची थकबाकी व वाढते कर्ज यामुळे हैराण झालेल्या व्होडाफोन-आयडियानं दरवाढ करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांना सरकारची मदतीची नितांत आवश्यकता आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत व्होडाफोन-आयडियाला विक्रमी तोटा झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम यांनी कंपनीला होत असलेल्या नुकसानावर भाष्य केलं.

व्होडाफोन-आयडियाला 53 हजार कोटींचे शुल्क सरकारला द्यावे लागणार असून, केंद्रानं यासाठी व्होडाफोन-आयडियाला मदत करायला हवी. जर केंद्र सरकारनंही व्होडाफोन-आयडियाकडे पाठ फिरवली, तर या कंपनीला भारतातून आपला व्यवसाय गुंडाळावा लागणार असल्याचंही कुमार मंगलम यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर शेअर बाजारातही मोठी घसरण झाली असून, व्होडाफोन आणि आयडियाच्या ग्राहकांच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे.

दूरसंचार परवाना आणि स्पेक्ट्रम शुक्लापोटी व्होडाफोन-आयडियाला जवळपास 53 हजार 38 कोटी सरकारकडे दंडाच्या स्वरूपात  भरावे लागणार आहेत. व्होडाफोनला 1.17 लाख कोटींचा तोटा झाल्यानंतर केंद्र सरकारनं या कंपनीला मदत करणं आवश्यक आहे. केंद्रानं मदत न केल्यास व्होडाफोन-आयडियाला सेवा बंद करावी लागू शकते, असे बिर्लांनी स्पष्ट केलेलं आहे. बिर्ला यांच्यापाठोपाठ उद्योजक राहुल बजाज यांनीसुद्धा सरकारच्या धोरणांवर टीका केली. दुसऱ्या तिमाहीत जीडीपी 4.5 टक्क्यांवर आला. त्यामुळे घसरत चाललेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचं सरकारसमोर मोठं आव्हान आहे, तसेच मुंबई, दिल्लीसारख्या प्रमुख शहरांमध्ये व्होडाफोनचे कोट्यवधी ग्राहक आहेत. तर या कंपन्या बंद झाल्या, दर भारतातल्या दूरसंचार क्षेत्रालाही घरघर लागण्याची भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे.  
 

Web Title: ... Otherwise Vodafone and Idea will have to shut down business, warns the Birla government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.