lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > येत्या 10 वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार- मुकेश अंबानी

येत्या 10 वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार- मुकेश अंबानी

मला विश्वास आहे की, येत्या 10 वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 08:46 PM2020-02-28T20:46:09+5:302020-02-28T21:07:23+5:30

मला विश्वास आहे की, येत्या 10 वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

In the next 10 years, India will be the third largest economy in the world - Mukesh Ambani vrd | येत्या 10 वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार- मुकेश अंबानी

येत्या 10 वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार- मुकेश अंबानी

Highlightsरिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना CNBC TV18नं देशातील सर्वात प्रतिष्ठित असलेल्या लीडर ऑफ द डेकेड या पुरस्कारानं गौरवलेलं आहे. मला विश्वास आहे की, येत्या 10 वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माझ्यासाठी आयुष्यातील एकमेव प्रतिष्ठित व्यक्ती माझे वडील धीरूभाई अंबानी आहेत.

नवी दिल्लीः रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना CNBC TV18नं देशातील सर्वात प्रतिष्ठित असलेल्या लीडर ऑफ द डेकेड या पुरस्कारानं गौरवलेलं आहे. पुरस्कार प्राप्त केल्यानंतर मुकेश अंबानींनी उपस्थितांना संबोधित केलं. येत्या 10 वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 
 
माझ्यासाठी आयुष्यातील एकमेव प्रतिष्ठित व्यक्ती माझे वडील धीरूभाई अंबानी आहेत. त्यांनी मला मोठी स्वप्नं पाहायला शिकवले. रिलायन्स आणि भारतासाठीही मोठे स्वप्न बघ असं ते कायम सांगायचे. म्हणून मी हा पुरस्कार माझे वडील धीरूभाई अंबानींना समर्पित करतो. गेल्या दशकात तरुणांच्या उत्कृष्ट कामामुळेच कंपनीनं प्रगती साधलेली आहे. आम्ही टेक्सटाइल कंपनीपासून सुरुवात केली, पेट्रोकेमिकल्स कंपनी आणि ऊर्जा कंपनी स्थापन करण्यापूर्वी आम्ही स्वतःला टेलिकॉम आणि रिटेल कंपनीमध्ये सिद्ध करून दाखवलं.

मी आपल्याला सांगू इच्छितो की, भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. वर्षं 2019मध्ये भारताने ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकले. यूएस-आधारित संशोधन संस्था वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्यूने आपल्या अहवालात म्हटले आहे की, पूर्वीच्या धोरणांना मागे टाकत भारत आता खुल्या बाजारातील अर्थव्यवस्थेच्या स्वरूपात विकसित होत आहे. अहवालानुसार, 'सकल घरगुती उत्पादन' (जीडीपी)मध्ये 2940 अब्ज डॉलर्ससह भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. भारतानं 2019मध्ये ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकल्याचं मुकेश अंबानींनी अधोरेखित केलं आहे. 
 

Web Title: In the next 10 years, India will be the third largest economy in the world - Mukesh Ambani vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.