Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील

...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील

जर तुम्ही एक महत्त्वाचं काम केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड १ जानेवारी २०२६ पासून निष्क्रिय होईल. पाहा काय आहे यामागचं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 16:31 IST2025-11-05T16:31:14+5:302025-11-05T16:31:14+5:30

जर तुम्ही एक महत्त्वाचं काम केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड १ जानेवारी २०२६ पासून निष्क्रिय होईल. पाहा काय आहे यामागचं कारण?

your PAN will be deactivated from January 1 2026 all important tasks including bank transactions will be stuck | ...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील

...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील

PAN-Aadhaar linking: भारत सरकारनं पॅन क्रमांक (PAN) आणि आधार कार्ड (Aadhaar Card) लिंक करणं अनिवार्य केलं आहे. कर सल्लागार मंच (Tax Advisor Forum) टॅक्सबडीनं (TaxBuddy) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स इशारा दिलाय की, जर तुम्ही ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पॅन आधारशी लिंक केलं नाही, तर तुमचं पॅन कार्ड १ जानेवारी २०२६ पासून निष्क्रिय होईल.

पॅन निष्क्रिय झाल्यास काय होईल?

टॅक्सबडीनुसार, 'तुमचं पॅन कार्ड १ जानेवारी २०२६ पासून डीएक्टिव्हेट होईल. तुम्ही आयटीआर (ITR) दाखल करू शकणार नाही, रिफंड मिळणार नाही. इतकंच नव्हे तर, तुमचा पगार जमा होणं किंवा एसआयपी ऑटो-डेबिट होणं देखील फेल होऊ शकतं.' कर तज्ज्ञांनी लोकांना लवकरात लवकर पॅन-आधार लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून आर्थिक व्यवहार किंवा करांशी संबंधित कोणत्याही कामात अडथळा येणार नाही.

२५० रुपयांची एसआयपीही तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश? पण कसं, जाणून घेऊ

लिंकिंगची अंतिम मुदत

पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत सरकारनं अनेक वेळा वाढवली आहे, परंतु सध्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ हीच निश्चित आहे. यानंतर मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे.

कोणाला लिंक करणे अनिवार्य?

अर्थ मंत्रालयाच्या ३ एप्रिल २०२५ च्या अधिसूचनेनुसार, 'प्रत्येक व्यक्ती, ज्याला १ ऑक्टोबर २०२४ पूर्वी आधार अर्जाच्या फॉर्मच्या एनरोलमेंट आयडीच्या आधारावर पॅन वाटप करण्यात आलं आहे, त्यांना आपला आधार क्रमांक ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आयकर विभागाला कळवावा लागेल.'

म्हणजेच, तुम्ही आधार एनरोलमेंट आयडीद्वारे पॅन बनवला असल्यास, आधार क्रमांक मिळाल्यानंतर पॅनला आधारशी लिंक करणं अनिवार्य आहे, जरी पॅन आधीच तयार झाला असला तरी. आयकर विभागाच्या ई-फाइलिंग पोर्टलवर ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनं खूप सहज करता येतं.

निष्क्रिय पॅनचे गंभीर परिणाम

जर तुम्ही ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पॅन-आधार लिंकिंग पूर्ण केलं नाही, तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन निष्क्रिय होईल. या स्थितीत तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागेल:

तुम्ही आयकर रिटर्न (ITR) दाखल किंवा व्हेरिफाय करू शकणार नाही.

कर परतावा (Tax Refund) मिळणार नाही.

प्रलंबित आयटीआर (Pending ITR) प्रोसेस होणार नाहीत.

टीडीएस/टीसीएसची (TDS/TCS) माहिती फॉर्म २६एएस (Form 26AS) मध्ये दिसणार नाही.

टीडीएस/टीसीएसची कपात उच्च दरान केली जाईल.

पॅन पुन्हा लिंक केल्यानंतर तो पुन्हा सक्रिय होईल.

निष्क्रिय पॅनचे आर्थिक परिणाम

पॅन निष्क्रिय झाल्यास तुमचं सध्याचं बँक खातं आणि गुंतवणूक सुरक्षित राहतील. तथापि, तुम्ही नवीन गुंतवणूक, शेअर ट्रेडिंग किंवा केवायसी अपडेट सारखे आर्थिक व्यवहार करू शकणार नाही. याव्यतिरिक्त, तुमचा पगार जमा होणं किंवा एसआयपी ऑटो-डेबिट देखील अयशस्वी होऊ शकते. नवीन बँक खाती उघडणं, गुंतवणूक करणं किंवा रिडीम करणं यात अडथळा येऊ शकतो. आयटीआर फाइलिंग किंवा टॅक्स कम्प्लायन्स (Tax Compliance) थांबेल. म्हणजे, तुमचा पैसा सुरक्षित असला तरी, पॅन पुन्हा सक्रिय होईपर्यंत आर्थिक व्यवहार आणि करांशी संबंधित सर्व कामे ठप्प होतील.

पॅन-आधार लिंक करण्याची प्रक्रिया 

१. आयकर विभागाच्या या https://www.incometax.gov.in अधिकृत वेबसाइटवर जा.

२. “Link Aadhaar” हा पर्याय निवडा.

३. पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक एन्टर करा.

४. ओटीपी (OTP) व्हेरिफाय करा.

५. जर पॅन आधीच निष्क्रिय असेल, तर आधी ₹१,००० शुल्क भरा.

६. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ‘Quick Links → Link Aadhaar Status’ मध्ये जाऊन स्थिती तपासा.

Web Title : पैन-आधार को दिसंबर 2025 तक लिंक करें, वरना आपका पैन निष्क्रिय हो जाएगा!

Web Summary : पैन-आधार लिंकिंग अनिवार्य है। 31 दिसंबर, 2025 तक लिंक नहीं होने पर, 1 जनवरी, 2026 से पैन निष्क्रिय हो जाएगा। इससे आईटीआर फाइलिंग, रिफंड और वित्तीय लेनदेन रुक जाएंगे। व्यवधान से बचने के लिए incometax.gov.in के माध्यम से लिंकिंग पूरी करें। निष्क्रिय पैन पुन: सक्रियण तक वित्तीय गतिविधियों को प्रभावित करते हैं।

Web Title : Link PAN-Aadhaar by December 2025, or your PAN will become inactive!

Web Summary : PAN-Aadhaar linking is mandatory. If not linked by December 31, 2025, PAN becomes inactive from January 1, 2026. This will halt ITR filings, refunds, and financial transactions. Complete linking via incometax.gov.in to avoid disruptions. Inactive PANs impact financial activities until reactivation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.