Lokmat Money > बिझनेस न्यूज > आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाहीत; RBI नं रद्द केला या बँकेचा लायसन्स, पुढे काय होणार?

आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाहीत; RBI नं रद्द केला या बँकेचा लायसन्स, पुढे काय होणार?

RBI Action On Bank: भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आणखी एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. पाहा का घेतलाय आरबीआयनं असा निर्णय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 11:04 IST2025-07-24T11:04:31+5:302025-07-24T11:04:31+5:30

RBI Action On Bank: भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आणखी एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. पाहा का घेतलाय आरबीआयनं असा निर्णय.

You cannot withdraw money from your own account RBI has cancelled the license of this bank what will happen next | आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाहीत; RBI नं रद्द केला या बँकेचा लायसन्स, पुढे काय होणार?

आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाहीत; RBI नं रद्द केला या बँकेचा लायसन्स, पुढे काय होणार?

RBI Action On Bank: भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आणखी एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) कर्नाटकातील कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केलाय. कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेकडे बँक चालविण्यासाठी पुरेसे भांडवल नाही किंवा कमाईची कोणतीही शक्यता नाही. बँकेची सद्यस्थिती पाहता आरबीआयनं त्यांचा परवाना रद्द केला. आरबीआयच्या या निर्णयानंतर कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक २३ जुलै २०२५ पासून सर्व बँकिंग व्यवहार बंद करणार आहे. म्हणजेच कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यात तात्काळ प्रभावानं पैसे जमा किंवा काढता नाहीत.

५ लाखांपर्यंतची रक्कम मिळणार

रिझर्व्ह बँकेनं बुधवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, 'रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज, कर्नाटक' यांना बँक बंद करण्याचा आदेश जारी करण्याची आणि बँकेसाठी लिक्विडेटर नियुक्त करण्याची विनंती करण्यात आली आहे. लिक्विडेशननंतर प्रत्येक ठेवीदाराला 'डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन'कडून (DICGC) पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर ठेव विमा दाव्याची रक्कम मिळणार आहे.

फ्लॅट ओपनिंगनंतर शेअर बाजार घसरला, Nifty २५,२०० च्या खाली; Tata Motors, Tata Consumer मध्ये तेजी

आरबीआयनं दिलेल्या माहितीनुसार बँकेनं सादर केलेल्या आकडेवारीनुसार, ९२.९ टक्के ठेवीदारांना डीआयसीजीसीकडून त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम मिळण्याचा अधिकार आहे. म्हणजेच कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ९२.९ टक्के ग्राहकांच्या खात्यात ५ लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम असून त्यांना डीआयसीजीसी अंतर्गत खात्यात जमा झालेले सर्व पैसे मिळतील.

यापूर्वीही काही बँकांचे परवाने रद्द

डीआयसीजीसीनं ३० जून २०२५ पर्यंत एकूण विमा ठेवींपैकी ३७.७९ कोटी रुपये भरले आहेत. रिझर्व्ह बँकेनं म्हटल्यानुसार, सहकारी संस्थेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नाही. आरबीआयनं यापूर्वीही अनेक बँकांवर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द केले होते. आरबीआयनं यापूर्वी लखनौमधील एचसीबीएल को-ऑपरेटिव्ह बँक, अहमदाबादमधील कलर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक, औरंगाबादमधील अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, जालंधरमधील इम्पीरियल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आदींचे परवाने रद्द केलेत.

Web Title: You cannot withdraw money from your own account RBI has cancelled the license of this bank what will happen next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.