आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्यानिमित्तानं, अदानी समूहानं नऊ देशांतील महिला राजदूतांच्या शिष्टमंडळाचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी गुजरातमधील खवडा आणि मुंद्रा येथील अदानी समूहाच्या विविध प्रकल्पांना भेट दिली आणि भारताची क्लिन एनर्जी, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासाची प्रगती जवळून पाहिली. या शिष्टमंडळात भारतातील इंडोनेशियाच्या राजदूत इना कृष्णमूर्ती, लिथुआनियाच्या भारतातील राजदूत डायना मिकीविच, भारतातील मोल्दोव्हाच्या राजदूत आना ताबान, भारत, नेपाळ आणि बांगलादेशातील रोमानियाच्या राजदूत सेना लतीफ, सेशेल्सच्या भारतातील उच्चायुक्त ललाटियाना अकोचे, भारतातील लेसोथोच्या उच्चायुक्त लेबोहांग व्हॅलेंटाईन मोचाबा, भारतातील एस्टोनियाच्या राजदूत मार्जे लूप, स्लोव्हेनियाच्या भारतातील राजदूत मातेजा वोदेब घोष आणि लक्झेंबर्गच्या भारतातील राजदूत पेगी फ्रँटझेन यांचा समावेश होता.
शिष्टमंडळानं सर्वप्रथम कच्छ येथील खावडा या ठिकाणचा दौरा केला. या ठिकाणी भारतातील सर्वात मोठी रिन्यूएबल कंपनी अदानी ग्रीन एनर्जीचा, जगातील सर्वात मोठा क्लिन एनर्जी प्रकल्प उभारला जात आहे. पॅरिसपेक्षाही पाच पट अधिक क्षेत्रात पसरलेल्या या प्रकल्पात ३० गीगाव्हॅट सोलर आणि विंड एनर्जी प्रकल्पातून भारताच्या ऊर्जेच्या वाढत्या गरजा पूर्ण केल्या जाणार आहेत.
रिन्यूएबल एनर्जी प्रोजेक्ट आधुनिक तंत्रज्ञानाला सस्टेनेबल डेव्हलपमेंटसोबत कशाप्रकारे इंटिग्रेट करत आहे, याची माहिती राजदुतांच्या शिष्टमंडळानं घेतली. याशिवाय महिला अभियंत्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या एनर्जी नेटवर्क ऑपरेशन्सबद्दलही (ईएनओसी) त्यांनी जाणून घेतलं.
त्यानंतर, शिष्टमंडळाने मुंद्रा बंदराला भेट दिली. या बंदराच्या माध्यमातून देशाच्या एकूण सागरी कार्गोच्या अंदाजे ११% आणि कंटेनर रहदारीच्या ३३% कामकाज हाताळलं जातं. येथे त्यांनी मुंद्रा स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये (एसईझेड) असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची (ईएमसी) पाहणी केली. याव्यतिरिक्त, त्यांनी भारताला अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या अदानींच्या अत्याधुनिक सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाला भेट दिली. या ठिकाणी राजदूतांनी भारताच्या औद्योगिक, आर्थिक आणि ऊर्जा परिवर्तनात योगदान देणाऱ्या महिला व्यावसायिक आणि अभियंत्यांची भेट घेतली. यावरून देशाच्या विकासात महिलांची भूमिका सातत्यानं वाढत असल्याचं स्पष्ट होतं.