Lokmat Money > बिझनेस न्यूज > Wipro Q1 Result: कंपनीला २८७० कोटींचा निव्वळ नफा, महसूलही २२,८०० कोटींवर 

Wipro Q1 Result: कंपनीला २८७० कोटींचा निव्वळ नफा, महसूलही २२,८०० कोटींवर 

प्रमुख आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रोनं जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 17:14 IST2023-07-13T17:14:25+5:302023-07-13T17:14:50+5:30

प्रमुख आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रोनं जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.

Wipro Q1 Result Company net profit at Rs 2870 crore revenue at Rs 22800 crore shares slightly increased | Wipro Q1 Result: कंपनीला २८७० कोटींचा निव्वळ नफा, महसूलही २२,८०० कोटींवर 

Wipro Q1 Result: कंपनीला २८७० कोटींचा निव्वळ नफा, महसूलही २२,८०० कोटींवर 

Wipro Q1 Result: प्रमुख आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रोनं (Wipro) जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा निव्वळ नफा 12 टक्क्यांनी वाढून 2870 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, कंपनीनं मागील वर्षीच्या याच कालावधीत 2563 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. त्याच वेळी, तिमाही आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 6.6 टक्क्यांनी घट झाली आहे. कंपनीचे या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे आले नाहीत. आर्थिक वर्ष 24 च्या पहिल्या तिमाहीत विप्रोचे स्टँड अलोन नेट प्रॉफिट 2,870 कोटी राहीले. परंतु विश्लेषकांनी 2,976 कोटी रुपयांचा अंदाज व्यक्त केला होता.

जून तिमाहीत विप्रोचा महसूल वार्षिक 6 टक्क्यांनी वाढून 22,831 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, विश्लेषकांना या कालावधीत 23014 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित होता. आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूल 21,528 कोटी रुपये होता. महसुलातील घट हे प्रामुख्याने बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा वर्टिकलमुळे झाली आहे.

विप्रोचे शेअर्स वधारले
गुरुवारी आयटी कंपनी विप्रोच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. कंपनीचे शेअर्समध्ये गुरुवारी 13 जुलै रोजी किरकोळ 0.75 टक्क्यांनी वाढ झाली. यानंतर कंपनची शेअर 394.80 रुपयांवर बंद झाले. गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्सची कामगिरी जवळपास फ्लॅट राहीली आहे.

Web Title: Wipro Q1 Result Company net profit at Rs 2870 crore revenue at Rs 22800 crore shares slightly increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.