lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > विप्रोचे नेतृत्व भारतीयाच्या हाती; जाणून घ्या कोण आहेत श्रीनी पल्लिया, पगार किती मिळणार..?

विप्रोचे नेतृत्व भारतीयाच्या हाती; जाणून घ्या कोण आहेत श्रीनी पल्लिया, पगार किती मिळणार..?

Wipro CEO Salary: टेक जायंट Wipro च्या सीईओपदी श्रीनी पल्लिया यांची नियुक्ती झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 06:53 PM2024-04-07T18:53:13+5:302024-04-07T18:54:07+5:30

Wipro CEO Salary: टेक जायंट Wipro च्या सीईओपदी श्रीनी पल्लिया यांची नियुक्ती झाली आहे.

Wipro headed by an Indian; Find out who is Srini Pallia, how much salary will he get..? | विप्रोचे नेतृत्व भारतीयाच्या हाती; जाणून घ्या कोण आहेत श्रीनी पल्लिया, पगार किती मिळणार..?

विप्रोचे नेतृत्व भारतीयाच्या हाती; जाणून घ्या कोण आहेत श्रीनी पल्लिया, पगार किती मिळणार..?

Wipro New CEO: भारतातील आघाडीची आयटी कंपनी Wipro मध्ये सध्या प्रचंड गदारोळ सुरू आहे. तिमाही निकालापूर्वी कंपनीचे CEO-MD थियरी डेलपोर्ट (Thierry Delport) यांनी राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या जागी कंपनीने श्रीनी पल्लिया(Srini Pallia) यांची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि एमडी म्हणून नियुक्ती केली आहे. श्रीनी पल्लिया पुढील पाच वर्षांसाठी विप्रोचे सीईओ असतील. 

विप्रोच्या नवीन सीईओ श्रीनी पल्लिया कोण आहेत?
विप्रोचे नेतृत्व आता एका भारतीयाच्या हातात असेल. 32 वर्षांपासून विप्रोमध्ये काम करणारे पल्लिया सध्या कंपनीतील कन्सल्टिंग अँड सर्व्हिसेल मल्टीनॅशनल अमेरिका-1 युनिटचे प्रमुख आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून अभियांत्रिकीची पदवी आणि आयटीमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर, त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनाचा अभ्यास केला. ते 1992 मध्ये विप्रोशी जोडले गेले. कंपनीत त्यांनी अनेक मोठी पदे सांभाळली आहेत. 

विप्रो सीईओचा पगार किती असेल
विप्रोचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी थियरी डेलापोर्टे हे भारतीय आयटी क्षेत्रातील सर्वाधिक पगार असलेल्या सीईओपैंकी एक आहेत. डेलापोर्टचे डिसेंबर 2023 चे वेतन प्रति वर्ष 82 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. भारतीय आयटी क्षेत्रातील सर्वाधिक पगार घेणारे सीईओ बनले. दरम्यान, पल्लिया यांचा पगार किती आहे, हे अद्याप समोर आले नाही. पण, त्यांचा पगार डेलापोर्टे यांच्या पगाराइतका असण्याची शक्यता आहे.

Web Title: Wipro headed by an Indian; Find out who is Srini Pallia, how much salary will he get..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.