Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > १ मार्चपासून ATM मधून ५०० रुपयांच्या नोटा काढता येणार नाहीत का? काय आहे या व्हायरल दाव्यामागचं सत्य

१ मार्चपासून ATM मधून ५०० रुपयांच्या नोटा काढता येणार नाहीत का? काय आहे या व्हायरल दाव्यामागचं सत्य

सध्या अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की मार्च २०२६ पासून एटीएममधून ५०० रुपयांच्या नोटा काढता येणार नाहीत. काय आहे यामागील सत्य, जाणून घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 13:46 IST2026-01-03T13:44:44+5:302026-01-03T13:46:47+5:30

सध्या अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की मार्च २०२६ पासून एटीएममधून ५०० रुपयांच्या नोटा काढता येणार नाहीत. काय आहे यामागील सत्य, जाणून घ्या.

Will 500 rupee notes not be available for withdrawal from ATMs from March 1 What is the truth behind this viral claim | १ मार्चपासून ATM मधून ५०० रुपयांच्या नोटा काढता येणार नाहीत का? काय आहे या व्हायरल दाव्यामागचं सत्य

१ मार्चपासून ATM मधून ५०० रुपयांच्या नोटा काढता येणार नाहीत का? काय आहे या व्हायरल दाव्यामागचं सत्य

सोशल मीडियावर अनेकदा अशा गोष्टी व्हायरल होतात ज्यांचा सत्याशी दुरूनही संबंध नसतो. मात्र, मोठ्या प्रमाणात शेअर झाल्यामुळे अशा पोस्ट लोकांमधे संभ्रम निर्माण करतात. सध्या अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की मार्च २०२६ पासून एटीएममधून ५०० रुपयांच्या नोटा काढता येणार नाहीत. व्हायरल पोस्टमध्ये असाही दावा केला आहे की,रिझर्व्ह बँक (RBI) यांच्या वितरणावर बंदी घालत आहे आणि मार्च २०२६ पासून ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर होतील.

काय आहे सत्य?

पीआयबीच्या (PIB) फॅक्ट चेक टीमने स्पष्ट केलंय की, अशा प्रकारच्या व्हायरल पोस्ट पूर्णपणे दिशाभूल करणाऱ्या आणि खोट्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. पीआयबीच्या टीमनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर याबद्दलची माहिती दिली आहे.

७ जानेवारीला उघडणार ४५ वर्ष जुन्या कंपनीचा IPO; किती करावी लागणार गुंतवणूक, प्राईज बँड किती? जाणून घ्या

पीआयबी टीमनं काय म्हटलंय?

५०० रुपयांच्या नोटांवर रिझर्व्ह बँकेनं कोणतीही बंदी घातलेली नाही.

या नोटा चलनातून बाहेर करण्यात आलेल्या नाहीत.

नागरिक या नोटांचा वापर पूर्वीप्रमाणेच करत राहू शकतात.

पीआयबीनं दिशाभूल न करुन घेता त्या अधिक शेअर न करण्याचं आवाहन केलं आहे.

यापूर्वीही झाले आहेत असे दावे

५०० रुपयांच्या नोटांबाबत अशा अफवा पसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा ५०० रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याबाबतच्या भ्रामक चर्चांनी जोर धरला होता. त्यामुळे सोशल मीडियावर अशी कोणतीही पोस्ट समोर आल्यास तिची खातरजमा करणं अत्यंत आवश्यक आहे.

एटीएममध्ये मिळतात प्रामुख्याने ५०० च्या नोटा

बहुतेक एटीएममध्ये ५०० रुपयांच्या नोटाच अधिक प्रमाणात उपलब्ध असतात. काही एटीएममध्ये १०० आणि २०० रुपयांच्या नोटाही असतात. अशा परिस्थितीत जर सरकारनं खरोखरच असा कोणताही निर्णय घेतला, तर लोकांसमोर अचानक मोठी समस्या उभी राहू शकते. मात्र, सध्या असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

Web Title : एटीएम से ₹500 के नोट बंद? वायरल दावा झूठा, आरबीआई ने नहीं लगाई रोक।

Web Summary : ₹500 के नोट मार्च 2026 से एटीएम में बंद होने का दावा झूठा है। पीआईबी फैक्ट चेक ने पुष्टि की है कि आरबीआई ने ऐसी कोई घोषणा नहीं की है; नोट अभी भी मान्य हैं।

Web Title : ₹500 notes ban in ATMs? Viral claim debunked, no RBI ban.

Web Summary : A viral claim about ₹500 notes being banned from ATMs starting March 2026 is false. PIB Fact Check confirms RBI has not announced any such ban; the notes remain valid.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.