आजवर केवळ दागिने आणि गुंतवणुकीचे साधन म्हणून ओळखली जाणारी ‘चांदी’ आता जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा बनली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सौरऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) आणि अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञान या चारही क्षेत्रांत चांदीचा वापर अनिवार्य झाल्याने भविष्यात चांदी सोन्यापेक्षाही अधिक महत्त्वाची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
‘एआय’चे ‘इंधन’ - एआयसाठी लागणारे हाय-परफॉर्मन्स चिप्स, सर्व्हर्स, जीपीयूत चांदीचा वापर अधिक. चांदीच्या विद्युत वाहकतेने प्रोसेसिंगसाठी याला पर्याय नाही.
सौरऊर्जा क्षेत्र - सोलर पॅनेल आणि बॅटरी निर्मितीमध्ये चांदीची भूमिका कळीची ठरत आहे. जास्तीत जास्त ऊर्जा साठवण्यासाठी चांदीचा वापर होतो.
इलेक्ट्रिक वाहने - बॅटरी तंत्रज्ञान, चार्जिंग स्टेशन्स आणि वाहनांमधील इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टिमसाठी चांदी हे ‘स्ट्रॅटेजिक असेट’ बनले आहे.
५ जी अन् संरक्षण - ५जी कनेक्टिव्हिटीसह लष्करी क्षेत्रातील स्टेल्थ सिस्टिम, अचूक मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि लेझर वेपन्समध्ये चांदीचा वापर वाढला आहे.
