Lokmat Money > बिझनेस न्यूज > बिटकॉइनला सर्वात मोठा धक्का! झालेल्या नुकसानात ३ देश राहिले असते उभे, काय आहे कारण?

बिटकॉइनला सर्वात मोठा धक्का! झालेल्या नुकसानात ३ देश राहिले असते उभे, काय आहे कारण?

Crypto Down : गेल्या आठवडाभरात बिटकॉइनच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. कॉइन मार्केट कॅपच्या आकडेवारीनुसार, गेल्या एका आठवड्यात बिटकॉइनमध्ये १५ टक्क्यांनी घसरण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 15:13 IST2024-12-24T15:12:35+5:302024-12-24T15:13:32+5:30

Crypto Down : गेल्या आठवडाभरात बिटकॉइनच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. कॉइन मार्केट कॅपच्या आकडेवारीनुसार, गेल्या एका आठवड्यात बिटकॉइनमध्ये १५ टक्क्यांनी घसरण झाली आहे.

Why Is Crypto Down Today Bitcoin Ethereum Dogecoin and XRP Are Crashing | बिटकॉइनला सर्वात मोठा धक्का! झालेल्या नुकसानात ३ देश राहिले असते उभे, काय आहे कारण?

बिटकॉइनला सर्वात मोठा धक्का! झालेल्या नुकसानात ३ देश राहिले असते उभे, काय आहे कारण?

Crypto Down : क्रिप्टोकरन्सीबिटकॉइननेगुंतवणूकदारांच्या हृदयाची चांगलीच धडधड वाढवली आहे. आठवडाभरापूर्वी, जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सीबिटकॉइन रेकॉर्ड मोडत होती. भाव सातत्याने वरच जात होता. बिटकॉइनचे मार्केट कॅप रशियाच्या GDP च्या बरोबरीने पोहोचले होते. त्यानंतर बिटकॉइनचा उलट प्रवास सुरू झाला आहे. गेल्या आठवडाभरात बिटकॉइनच्या किमतीत सुमारे १५ टक्क्यांची घसरण झाली आहे. मार्केट कॅप २ ट्रिलियन डॉलरच्या खाली गेले आहे. तोटा इतका झाला की त्या रकमेत फिनलंड, पोर्तुगाल आणि कझाकस्तान सारखे नवीन देश निर्माण होऊ शकले असते. या कालावधीत ३०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यामागची कारणे आता समोर आली आहेत.

बिटकॉइनच्या किमतीत मोठी घसरण
गेल्या आठवडाभरात बिटकॉइनच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. कॉइन मार्केट कॅपच्या आकडेवारीनुसार, गेल्या एका आठवड्यात त्याच्या ऐतिहासिक  उच्चांकावरून १५ टक्क्यांनी घसरले आहे. जर आपण डेटा पाहिला तर १७ डिसेंबर रोजी बिटकॉइनची किंमत १,०८,२६८.४५ डॉलर वर पोहोचली होती. जी २४ डिसेंबर रोजी ९२,४०३.१३ डॉलरपर्यंत खाली आली. याचा अर्थ बिटकॉइनच्या किमतीत गेल्या एका आठवड्यात १५,८६५.३२ डॉलरची घसरण झाली आहे. सध्या, बिटकॉइनची किंमत १.२५ टक्क्यांच्या घसरणीसह ९४,१२९.०९ डॉलरवर व्यापार करत आहे. तज्ज्ञांच्या मते, फेड पॉलिसीमुळे बिटकॉइनच्या किमतीत घट झाली आहे. येत्या काही दिवसांत बिटकॉइनच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता आहे.

मार्केट कॅपमध्येही घसरण
बिटकॉइनच्या घसरलेल्या किमतीमुळे बिटकॉइनचे मार्केट कॅपही खाली आले आहे. २ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त मार्केट कॅप असलेले बिटकॉइन रशियाच्या GDP च्या बरोबरीचे होते. बाजार भांडवल आता २ ट्रिलियन डॉलरच्या खाली आले आहे. १७ डिसेंबर रोजी बिटकॉइनचे मार्केट कॅप २.१३ ट्रिलियन डॉलरवर होते. जे २४ डिसेंबर रोजी १.८२ ट्रिलियन डॉलरवर आले. याचा अर्थ असा की गेल्या एका आठवड्यात बिटकॉइनच्या किमतीत ३१० अब्ज डॉलरची घट झाली आहे.

नुकसानात ३ देश राहिले असते उभे
बिटकॉइनच्या मार्केट कॅपला ३१० बिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे. या रकमेतून फिनलंड, पोर्तुगाल आणि कझाकस्तानसारखे देश निर्माण होऊ शकले असते. होय, या देशांचा जीडीपी ३०० अब्ज डॉलरच्या श्रेणीत आहे. IMF च्या अंदाजानुसार, फिनलंडची एकूण GDP ३०६ अब्ज डॉलर आहे. तर पोर्तुगालचा अंदाजे जीडीपी ३०३ अब्ज डॉलर्स आहे. IMF च्या अंदाजानुसार, कझाकिस्तानचा GDP २९३ अब्ज डॉलर्स आहे. यावरुन तुम्हाला अंदाज येईल की आठवड्यात बिटकॉइनचे किती नुकसान झाले.

Web Title: Why Is Crypto Down Today Bitcoin Ethereum Dogecoin and XRP Are Crashing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.