Lokmat Money > बिझनेस न्यूज > जगाला धमकी देता देता ट्रम्प यांनी आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली, अमेरिकेबाबत आली वाईट बातमी

जगाला धमकी देता देता ट्रम्प यांनी आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली, अमेरिकेबाबत आली वाईट बातमी

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून २० जानेवारी कामकाजाची धुरा हाती घेतली. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होताच त्यांनी अमेरिका फर्स्टचा नारा देत अनेक धक्कादायक निर्णय घेतले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 10:56 IST2025-06-04T10:55:16+5:302025-06-04T10:56:12+5:30

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून २० जानेवारी कामकाजाची धुरा हाती घेतली. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होताच त्यांनी अमेरिका फर्स्टचा नारा देत अनेक धक्कादायक निर्णय घेतले.

While threatening the world Trump shot himself in the foot bad news came about America economy gdp | जगाला धमकी देता देता ट्रम्प यांनी आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली, अमेरिकेबाबत आली वाईट बातमी

जगाला धमकी देता देता ट्रम्प यांनी आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली, अमेरिकेबाबत आली वाईट बातमी

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून २० जानेवारी कामकाजाची धुरा हाती घेतली. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होताच त्यांनी अमेरिका फर्स्टचा नारा देत अनेक धक्कादायक निर्णय घेतले. जगभरातील देशांवर शुल्क लादणं, अमेरिकेत कंपन्यांचं उत्पादन सुरू करणं, स्थलांतरितांना बाहेर काढणं आदी त्यांच्या प्रमुख निर्णयांचा समावेश होता. त्यांच्या या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली. अमेरिकाही स्वत:ही त्याला अपवाद नाही. मात्र, हे सुरुवातीचा त्रास असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं. याचे दूरगामी परिणाम होतील आणि अमेरिकेत पुन्हा समृद्धी येईल. पण आता चित्र नेमकं उलट दिसू लागलंय. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेत मंदीची भीती निर्माण झाली आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावू लागलीये. यामुळे अमेरिकेत बेरोजगारी वाढण्याचा धोकाही आहे.

विकासदर घसरला

ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंटनं (ओईसीडी) मंगळवारी एक अहवाल सादर केला. यात अमेरिकेचा आर्थिक विकास दर गेल्या वर्षीच्या २.८ टक्क्यांवरून यंदा १.६ टक्क्यांवर येणार असल्याचं नमूद केलंय. ही संस्था आंतरराष्ट्रीय व्यापार आणि समृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी काम करते आणि वेळोवेळी अहवाल आणि विश्लेषण प्रसिद्ध करते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनिश्चित व्यापार युद्धामुळे जागतिक व्यापारात झालेला विस्कळीतपणा, वाढता खर्च आणि त्याचा व्यवसाय तसंच ग्राहकांवर होणारा परिणाम हे याचे मुख्य कारण आहे. 

अमेरिका-चीनचं भांडण भारताच्या उंबरठ्यापर्यंत; जपान-जर्मनीही त्रस्त, कंपन्यांना टाळं ठोकण्याची वेळ

ओईसीडीच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिकेचे सरासरी शुल्क दर १५.४ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत, जे १९३८ नंतरचे सर्वाधिक दर आहेत. ते दुसऱ्यांदा सत्तेवर आले तेव्हा ते अडीच टक्क्यांच्या आसपास होते. आयात केलेल्या कच्च्या मालावर आणि घटकांवर अवलंबून असलेल्या ग्राहकांसाठी आणि अमेरिकन उत्पादकांसाठी शुल्कामुळे खर्च वाढतो.

अर्थव्यवस्थेचा वेगही मंदावणार

ओईसीडीच्या अंदाजानुसार, जागतिक आर्थिक विकास दर या वर्षी केवळ २.९ टक्क्यांपर्यंत कमी होईल आणि २०२६ पर्यंत याच पातळीवर राहील. गेल्या वर्षीच्या ३.३ टक्के आणि २०२३ च्या ३.४ टक्के वाढीच्या तुलनेत ही लक्षणीय घट आहे. पॅरिस स्थित ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (ओईसीडी) मध्ये ३८ सदस्य देश आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार युद्धामुळे जानेवारी-मार्चच्या पहिल्या तिमाहीत अमेरिकी अर्थव्यवस्था ०.२ टक्क्यांनी घसरली. गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच अमेरिकेच्या जीडीपीमध्ये घसरण झाली आहे.

सरकारनं गुरुवारी दुसरा अंदाज जाहीर केला, जो आधीच्या अंदाजापेक्षा थोडा चांगला आहे. पहिल्या तिमाहीतील वाढीत झालेल्या घसरणीचं कारण आयातीत झपाट्यानं झालेली वाढ होती, कारण ट्रम्प यांनी भरमसाठ आयात शुल्क लावण्यापूर्वी अमेरिकेतील कंपन्यांनी परदेशी वस्तू आणण्यासाठी धाव घेतली होती.

Web Title: While threatening the world Trump shot himself in the foot bad news came about America economy gdp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.