बहुतेक लोक आपली बचत सुरक्षित ठेवण्यासाठी बँक खात्याचा वापर करतात आणि त्यांना वाटतं की बँकेत ठेवलेले त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. परंतु, जर एखादी बँक बुडाली, तर अशा परिस्थितीत ग्राहकाच्या पैशांचे काय होईल, असा प्रश्न अनेकांना पडतो. रिझर्व्ह बँकेनं (RBI) यासाठी काही नियम निश्चित केले आहेत, ज्यामध्ये बँक बुडाल्यास ग्राहकांना त्यांचे पैसे कसे मिळतील, हे स्पष्ट करण्यात आले आहे.
बँकेत ठेवलेले पैसे किती सुरक्षित?
जर एखादी बँक बंद झाली, तर ग्राहकाचे पैसे सुरक्षित राहतात. हे पैसे DICGC (डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन) अंतर्गत सुरक्षित असतात. DICGC ही आरबीआयच्या पूर्ण मालकीची उपकंपनी आहे, जी भारतातील बँक ठेवीदारांना संरक्षण प्रदान करते. बँक बुडाल्यास DICGC लोकांच्या पैशांचं रक्षण करतं.
युद्धादरम्यान ₹१२,३६४ नं स्वस्त झालं सोनं; चांदीच्या दरात ₹३७,७६५ ची घसरण, पुढे काय होणार?
DICGC विमा काय काम करतोय?
DICGC बँक ठेवींचा विमा उतरवते. प्रत्येक बँक ग्राहकाला DICGC अंतर्गत कमाल ५ लाख रुपयांपर्यंतचा विमा संरक्षण मिळतं. या ५ लाख रुपयांच्या मर्यादेत तुमचं बचत खातं, एफडी, आरडी या सर्वांचा समावेश होतो. म्हणजेच, जर तुमच्या खात्यात ५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम असेल, तर पूर्ण पैसे परत मिळू शकतात.
मात्र, जर तुमच्या बँक खात्यात ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल आणि बँक बुडाली, तरीही DICGC कडून केवळ ५ लाख रुपयांपर्यंतचाच क्लेम दिला जातो. ५ लाखांवरील अतिरिक्त रकमेची कोणतीही हमी नसते. तरीही, क्लेमची रक्कम बँकेच्या स्थितीवर अवलंबून असतं.
बँक बुडाल्यावर किती दिवसांत पैसे मिळतात?
जेव्हा एखादी बँक बुडते किंवा त्यावर निर्बंध लादले जातात, तेव्हा DICGC च्या माध्यमातून ग्राहकांना पैसे परत केले जातात. सामान्यतः DICGC द्वारे ९० दिवसांच्या आत पैसे देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. यासाठी ग्राहकाला वेगळा अर्ज करण्याची गरज नसते; बँक स्वतः ही प्रक्रिया पूर्ण करते. DICGC विमा सर्व सरकारी, खाजगी आणि सहकारी बँकांसाठी लागू आहे.
