Lokmat Money > बिझनेस न्यूज > टॅरिफ युद्धात गुंतवणूकदारांनी काय करावं, या टॅरिफचा नक्की अर्थ तरी काय?

टॅरिफ युद्धात गुंतवणूकदारांनी काय करावं, या टॅरिफचा नक्की अर्थ तरी काय?

२ एप्रिल रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनवर ३४ टक्के, भारतावर २७ टक्के, युरोपियन युनियनवर २० टक्के आणि जपान व इतर देशांवर २४ टक्के दराने परस्पर टॅरिफ लादले. चीननेही अमेरिकेवर जास्त टॅरिफ लादले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 14:10 IST2025-04-14T14:08:28+5:302025-04-14T14:10:46+5:30

२ एप्रिल रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनवर ३४ टक्के, भारतावर २७ टक्के, युरोपियन युनियनवर २० टक्के आणि जपान व इतर देशांवर २४ टक्के दराने परस्पर टॅरिफ लादले. चीननेही अमेरिकेवर जास्त टॅरिफ लादले.

What should investors do in a tariff war What exactly do these tariffs mean | टॅरिफ युद्धात गुंतवणूकदारांनी काय करावं, या टॅरिफचा नक्की अर्थ तरी काय?

टॅरिफ युद्धात गुंतवणूकदारांनी काय करावं, या टॅरिफचा नक्की अर्थ तरी काय?

अर्जुन : कृष्णा, शेअर बाजारावर टॅरिफचा काय परिणाम होतो?

कृष्ण : अर्जुना, २ एप्रिल २०२५ रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनवर ३४ टक्के, भारतावर २७ टक्के, युरोपियन युनियनवर २० टक्के आणि जपान व इतर देशांवर २४ टक्के दराने परस्पर टॅरिफ लादले. चीननेही अमेरिकेवर जास्त टॅरिफ लादले. यामुळे जागतिक बाजारात मोठी घसरण झाली.

अर्जुन : कृष्णा, या टॅरिफचा अर्थ काय? 

कृष्ण : अर्जुना, टॅरिफ म्हणजे सामान्य भाषेत शुल्क किंवा कर. परदेशी कंपन्यांपासून देशातील उद्योगांच्या संरक्षणासाठी टॅरिफ आकरले जाते. उदाहरणार्थ, भारत परदेशातून काही वस्तू आयात करत असेल आणि भारताने आयात होणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ लादले तर आयात महाग होते.  

अर्जुन : कृष्णा, यामुळे शेअर बाजारात घसरण का सुरू झाली?

कृष्ण : अर्जुना, जेव्हा देश एकमेकांवर टॅरिफ लावतात, तेव्हा जागतिक व्यापारात असंतुलन निर्माण होते, त्यामुळे जागतिक मंदी येऊ शकते.

अर्जुन : कृष्णा, अशा परिस्थितीत सामान्य गुंतवणूकदारांनी काय करावे?

कृष्ण : दीर्घकालीन गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचा कालावधी १० वर्षांहून अधिक असल्याने त्यांना या घसरणीची फारशी चिंता फारशी नाही. मध्यम मुदतीचा गुंतवणूकदार ५-१० वर्षांच्या कालावधीत गुंतवणूक करतो, त्याने आपल्या जोखीम क्षमतेचे काळजीपूर्वक मूल्यमापन केले पाहिजे. जोखमीची गुंतवणूक कमी केली करुन सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले पाहिजे. अल्पकालीन गुंतवणूकदार ३-५ वर्षांच्या काळासाठी गुंतवणूक करतो. जोखमीच्या सट्टेबाजीत त्याने गुंतवणूक करू नये आणि सुरक्षित खेळावे.

जानेवारी २०२४ पासून गुंतवणुकीला सुरुवात केलेल्या नव्या गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ लाल झाला आहे, पण त्यांनी या परिस्थितीतून घाबरून न जाता आपल्या गुंतवणुकीच्या धोरणावर ठाम राहावे.  

उमेश शर्मा,
चार्टर्ड अकाउंटंट

Web Title: What should investors do in a tariff war What exactly do these tariffs mean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.