Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा परस्पर शुल्कावर मोठा धमाका केला आहे. आता त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केलीये. ९० दिवसांची स्थगिती असली तरी कोणत्याही देशाला शुल्कातून सूट दिली जाणार नाही, असं त्यांनी यात म्हटलंय. ट्रम्प प्रशासन कम्प्युटर, स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवरील शुल्कातून सूट देणार असल्याचं अमेरिकेद्वारे जारी करण्यात आलेल्या एका नोटिफिकेशनमध्ये म्हटलं होतं. पण त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणताही देश शुल्क टाळू शकणार नाही, असं म्हणत यु-टर्न घेतलाय.
शुल्काला अपवाद नाही
शुल्काला अपवाद नाही, ते सर्व देशांवर लादले जातील, यावर ट्रम्प यांनी भर दिला. अनेक देशांनी आपल्यावर, विशेषत: चीनविरुद्ध अनुचित व्यापार समतोल साधला आहे. नॉन मॉनेटरी टॅरिफ बॅरिअर्ससाठी कोणतीही सूट दिली जात नाही. शुल्काला काही अपवाद असेल असं काहीही शुक्रवारी सांगण्यात आलेलं नाही, असंही ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे म्हटलं.
हेही वाचा - FD वर मिळतंय ८ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज, 'या' बँका देताहेत जबरदस्त इंटरेस्ट रेट
अमेरिकेच्या चांगल्या दिवसांची सुरुवात
ही उत्पादने सध्याच्या २०% फेंटॅनिल टॅरिफच्या अधीन आहेत आणि ते फक्त वेगळ्या टॅरिफ बकेट मध्ये जात आहेत. फेक न्यूजला हे माहित आहे, परंतु ते त्याची बातमी देण्यास नकार देतात. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आम्ही सेमीकंडक्टर आणि संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रित केलं आहे. आपल्याला इतर देशांनी, विशेषत: चीनसारख्या देशांनी वेठीस धरू नये, यासाठी अमेरिकेत उत्पादन वाढवण्याची गरज आहे. अमेरिकन जनतेचा अनादर करण्यासाठी जे देश आपल्या परीनं प्रयत्न करत आहेत, त्यांना आम्ही तसं करू देणार नाही. अनेक देश दशकांपासून हे करत आहेत, पण आता अमेरिकेसाठी ते दिवस संपले आहेत," असं म्हणत ट्रम्प यांनी खडसावलंय.
🚨President Trump says NOBODY is getting “off the hook” for unfair trade balances and nom monetary tariff barriers. pic.twitter.com/Hodc9myGv6
— Benny Johnson (@bennyjohnson) April 13, 2025
आता अमेरिकेचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. जेवढं उत्पादन वाढेल तेवढ्या लोकांना नोकऱ्या मिळतील. इतर देशांना, विशेषत: चीनला जशी वागणूक दिली जाईल, तशीच वागणूक ते अनेक दशकांपासून देत आले आहेत. अमेरिकेला पुन्हा महान बनवलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
इतर देशांशी वाटाघाटी करण्यास तयार
अमेरिका आणि चीनमधील शुल्क वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही आपण इतर देशांशी चर्चा करण्यास तयार असल्याचे संकेत दिलेत. चीन वगळता बहुतांश देशांना जवळपास ९० दिवसांसाठी शुल्कातून दिलासा मिळाला आहे. या काळात सर्व देशांवर बेसलाइन १० टक्के टॅरिफ लावण्यात येणार आहे. अमेरिकेने चीनवर १४५ टक्के, तर चीनने अमेरिकेवर १२५ टक्के शुल्क लादलं आहे.