Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > महापूर, भूकंप, वादळापासून स्वत:चं घर वाचवायचंय? 'प्रॉपर्टी इन्शुरन्स' हाच सर्वोत्तम फॉर्म्युला

महापूर, भूकंप, वादळापासून स्वत:चं घर वाचवायचंय? 'प्रॉपर्टी इन्शुरन्स' हाच सर्वोत्तम फॉर्म्युला

घरातील सामान, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, दुकानातील साठा हेदेखील यामध्ये समाविष्ट होऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 08:22 IST2025-06-04T08:20:45+5:302025-06-04T08:22:01+5:30

घरातील सामान, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, दुकानातील साठा हेदेखील यामध्ये समाविष्ट होऊ शकतो.

Want to protect your home from floods, earthquakes, storms? Property insurance is the best formula | महापूर, भूकंप, वादळापासून स्वत:चं घर वाचवायचंय? 'प्रॉपर्टी इन्शुरन्स' हाच सर्वोत्तम फॉर्म्युला

महापूर, भूकंप, वादळापासून स्वत:चं घर वाचवायचंय? 'प्रॉपर्टी इन्शुरन्स' हाच सर्वोत्तम फॉर्म्युला

कधी विचार केला आहे का, जर तुमच्या घराला किंवा एखाद्या मालमत्तेला आग लागली, पूर आला किंवा चोरी झाली, तर काय होईल? झालेले नुकसान कसे भरून काढाल? या तिन्हीवर एकच उपाय आहे तो म्हणजे प्रॉपर्टी इन्शुरन्स. प्रॉपर्टी इन्शुरन्स ही विमा पॉलिसी आहे, तुमच्या घर, दुकान, ऑफिस किंवा कोणत्याही मालमत्तेला होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करते. घरातील सामान, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, दुकानातील साठा हेदेखील यामध्ये समाविष्ट होऊ शकतो.

अनपेक्षित घटनांमध्ये तुम्हाला आधार मिळतो. प्रॉपर्टी इन्शुरन्स हा एक करार असतो. त्यात दरमहा किंवा दरवर्षी एक ठराविक रक्कम प्रीमियम म्हणून द्यावी लागते. बदल्यात, कंपनी मालमत्तेला काही नुकसान झाल्यास पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या वस्तूंच्या भरपाईचा खर्च उचलते. 

प्रत्येक पॉलिसीमध्ये काही अटी असतात. काही मौल्यवान वस्तू जसे दागिने, मौल्यवान चित्रे, किंवा रोकड याची भरपाई हवी असल्यास तशी विनंती करावी लागते. या वस्तूंची खरी किंमत त्यात नमूद करावी लागते. मालमत्तेची किंमत कमी दाखवली, तर क्लेम करताना तुम्हाला त्याच प्रमाणात कमी नुकसान भरपाई मिळेल.

Web Title: Want to protect your home from floods, earthquakes, storms? Property insurance is the best formula