नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये पळून गेलेला कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्या हा युनायटेड ब्रेवरीज लिमिटेडच्या (यूबीएल) संचालक मंडळाचा राजीनामा देण्यास तयार झाला असून, तो आपल्या पसंतीचा उमेदवार देणार आहेत.
मल्ल्या हा सहेतुक कर्जबुडवा म्हणून घोषित झाला आहे. सहेतुक कर्जबुडव्यांना सूचीबद्ध कंपन्यांच्या संचालक मंडळावर राहता येत नाही. या अनुषंगाने सेबीने एक आदेश जारी करून मल्ल्या याला अपात्र घोषित केले आहे. यूबीएलमध्ये भागीदार असलेल्या हिनेकेनसोबतच्या करारानुसार मल्ल्या हा यूबीएलचा तहहयात चेअरमन राहू शकतो. तो अनिवृत्त संचालक आहे. त्याला काढले जाऊ शकत नाही; मात्र तो स्वत: राजीनामा देऊन आपल्या पसंतीचा उमेदवार पदावर बसवू शकतो. त्यानुसार, तो संचालक मंडळाचा राजीनामा देणार
असल्याचे समजते.
विजय मल्ल्यायुनायटेड ब्रेवरीज लिमिटेडच्या (यूबीएल) संचालक मंडळाचा राजीनामा देणार
नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये पळून गेलेला कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्या हा युनायटेड ब्रेवरीज लिमिटेडच्या (यूबीएल) संचालक मंडळाचा राजीनामा देण्यास तयार झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 17:24 IST2017-10-24T04:07:02+5:302017-10-24T17:24:12+5:30
नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये पळून गेलेला कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्या हा युनायटेड ब्रेवरीज लिमिटेडच्या (यूबीएल) संचालक मंडळाचा राजीनामा देण्यास तयार झाला
