Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अति महत्त्वाची बातमी-पोलीस निलंबन

अति महत्त्वाची बातमी-पोलीस निलंबन

पोलीस कर्मचारी बीडकर निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:12+5:302016-03-03T01:57:12+5:30

पोलीस कर्मचारी बीडकर निलंबित

Very important news-police suspension | अति महत्त्वाची बातमी-पोलीस निलंबन

अति महत्त्वाची बातमी-पोलीस निलंबन

लीस कर्मचारी बीडकर निलंबित
पैठण ठाण्यात घातला गोंधळ : पोलीस अधीक्षकांची कारवाई
पैठण : पैठण पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेला पोलीस कर्मचारी सचिन बीडकर याने पुन्हा पैठण पोलीस ठाण्यात येऊन गोंधळ घालत पोलीस निरीक्षकांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला़ याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी गंभीर दखल घेत बीडकरला निलंबित केले़
पोलिसांनी सांगितले की, पैठण ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस सचिन बीडकर याने मागील आठवड्यात रात्रीच्या वेळी कोर्ट रोड परिसरात राहणार्‍या महिलेचा विनयभंग करून सदर महिलेच्या मुलास मारहाण केली होती़ यानंतर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता़
दरम्यान, सोमवारी बीडकर पैठण ठाण्यात गेला व माझ्याविरुद्ध गुन्हा का दाखल केला म्हणून पो़नि़ काकडे यांच्याविरुद्ध अपशब्द वापरले़ यानंतर त्यांच्या कक्षाकडे धावून जात असताना ठाण्यातील कर्मचार्‍यांनी त्याला अडविले़ यानंतर ठाण्यात एकच गोंधळ उडाला़
याप्रकरणी पो़नि़ काकडे यांच्या फिर्यादीवरून सचिन बीडकरविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ बीडकर मात्र या घटनेनंतर फरार झाला़ याबाबत सचिन बीडकर यास निलंबित करण्यात आल्याचे पैठणचे उपविभागीय अधिकारी बच्चनसिंह यांनी सांगितले, तसेच त्याची पैठण येथून ग्रामीण पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली असल्याचेही सिंह म्हणाले़
-------------------

Web Title: Very important news-police suspension