Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'सबकुछ ट्रम्प!' आता डॉलरवरही असणार Donald Trump यांची सही; इतिहासात पहिल्यांदाच विद्यमान राष्ट्राध्यक्ष करणार साईन

'सबकुछ ट्रम्प!' आता डॉलरवरही असणार Donald Trump यांची सही; इतिहासात पहिल्यांदाच विद्यमान राष्ट्राध्यक्ष करणार साईन

Donald Trump Signature On Dollar: अमेरिकेत या वर्षाच्या अखेरीस डॉलरच्या नोटांमध्ये एक मोठा आणि ऐतिहासिक बदल पाहायला मिळू शकतो. पाहा काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 08:46 IST2026-03-27T08:44:19+5:302026-03-27T08:46:56+5:30

Donald Trump Signature On Dollar: अमेरिकेत या वर्षाच्या अखेरीस डॉलरच्या नोटांमध्ये एक मोठा आणि ऐतिहासिक बदल पाहायला मिळू शकतो. पाहा काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन?

us president Donald Trump signature will now be on the dollar For the first time in history a sitting president will sign | 'सबकुछ ट्रम्प!' आता डॉलरवरही असणार Donald Trump यांची सही; इतिहासात पहिल्यांदाच विद्यमान राष्ट्राध्यक्ष करणार साईन

'सबकुछ ट्रम्प!' आता डॉलरवरही असणार Donald Trump यांची सही; इतिहासात पहिल्यांदाच विद्यमान राष्ट्राध्यक्ष करणार साईन

Donald Trump Signature On Dollar: अमेरिकेत या वर्षाच्या अखेरीस डॉलरच्या नोटांमध्ये एक मोठा आणि ऐतिहासिक बदल पाहायला मिळू शकतो. आता अमेरिकन चलनावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी दिसणार आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागानं याबाबतची अधिकृत घोषणा केली. अमेरिकेच्या २५० व्या वर्धापनदिनानिमित्त हे पाऊल उचललं जात असून, हा एक प्रतिकात्मक आणि महत्त्वाचा निर्णय मानला जातोय. 'न्यू यॉर्क टाइम्स'च्या वृत्तानुसार, या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर डोनाल्ड ट्रम्प हे डॉलरच्या नोटेवर स्वाक्षरी असलेले पहिले विद्यमान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरतील. त्यांची स्वाक्षरी ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांच्या नावासोबत छापली जाईल. विशेष म्हणजे, या बदलासह गेल्या एका शतकापासून चलनावर छापलं जाणारं 'अमेरिकन ट्रेझरर'चं नाव आता हटवलं जाईल

ट्रेझरी विभागाची भूमिका

स्कॉट बेसेंट यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय की, देशाच्या ऐतिहासिक कामगिरीचा आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हे एक योग्य पाऊल आहे. अमेरिकेच्या २५० व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांनी याला 'गौरवपूर्ण उपक्रम' असं संबोधलंय. व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रीय संस्थांवर आपली ओळख मजबूत करण्यासाठी सातत्यानं पावलं उचलत आहेत. यामध्ये त्यांनी अनेक बदल केलेत.

  • स्वतःचं चित्र असलेलं १ डॉलरचं नाणं जारी करण्याचा प्रस्ताव दिला.
  • २४ कॅरेट सोन्याचं स्मारक नाणं बनवण्याची घोषणा केली.
  • वॉशिंग्टन येथील 'जॉन एफ. केनेडी परफॉर्मिंग आर्ट्स सेंटर'शी आपलं नाव जोडलं.
  • 'डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळा'चं नाव बदलण्याचा प्रस्ताव ठेवला.
  • इतकंच नाही तर, त्यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी कोविड-१९ मदत चेकवरही स्वतःची स्वाक्षरी समाविष्ट केली होती.

चलनावरील स्वाक्षरीचा इतिहास

अमेरिकन चलनावर स्वाक्षरी करण्याची परंपरा १८६१ मध्ये सुरू झाली, जेव्हा अब्राहम लिंकन यांनी यासंबंधीचा कायदा मंजूर केला होता. १९१४ पासून ट्रेझरी सेक्रेटरी आणि ट्रेझरर या दोघांच्या स्वाक्षऱ्या नोटांवर छापल्या जात आहेत. ट्रम्प यांची स्वाक्षरी सर्वच डॉलर नोटांवर असेल की केवळ काही मर्यादित सिरीजमध्ये, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ट्रेझरी विभागानं यावर अजून सविस्तर माहिती दिलेली नाही.

समर्थन आणि टीका

या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ट्रेझरर ब्रँडन बीच यांनी या निर्णयाचं समर्थन करताना म्हटलं की, ट्रम्प यांचं आर्थिक योगदान ऐतिहासिक असून त्यांचे नाव चलनावर असणं योग्य आहे. दुसरीकडे, रिपब्लिकन अर्थतज्ज्ञ डग्लस होल्ट्झ-ईकिन यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं की, याचा राष्ट्रीय हिताशी थेट संबंध स्पष्ट नाही. तसंच, डिजिटल व्यवहारांच्या युगात अशा बदलाचा प्रभाव मर्यादित असू शकतो. 'ब्युरो ऑफ एन्ग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग'चे माजी संचालक लॅरी फेलिक्स यांच्या मते, ट्रम्प यांची स्वाक्षरी असलेल्या नोटा भविष्यात दुर्मिळ होऊ शकतात आणि त्यांचा संग्रह करणाऱ्यांमध्ये त्यांची मागणी वाढू शकते.

वादाची शक्यता

अमेरिकन चलनातील बदल अनेकदा वादाचे कारण ठरले आहेत. ओबामा प्रशासनाच्या काळात हॅरिएट टबमन यांचं चित्र २० डॉलरच्या नोटेवर आणण्याची योजना आखण्यात आली होती, परंतु ती लागू होऊ शकली नाही.

Web Title : अमेरिकी डॉलर पर डोनाल्ड ट्रम्प के हस्ताक्षर हो सकते है।

Web Summary : डोनाल्ड ट्रम्प के हस्ताक्षर वाले डॉलर जल्द ही आएंगे। ट्रेजरी विभाग ने 250वीं वर्षगांठ पर यह कदम उठाया। इस बदलाव पर मिश्रित प्रतिक्रियाएं सामने आ रही हैं, साथ ही नोटों से 'अमेरिकन ट्रेजरर' का नाम भी हट जाएगा।

Web Title : Trump's signature may soon appear on US dollar notes.

Web Summary : Donald Trump's signature may appear on dollar notes, a historic first. The Treasury Department's move marks the 250th anniversary. Mixed reactions arise over the change, which also removes 'American Treasurer' from notes.