Lokmat Money > बिझनेस न्यूज > तुमच्या मोबाईलवरुनही ऑनलाइन पेमेंट होत नाही? एनपीसीआयने सांगितला उपाय

तुमच्या मोबाईलवरुनही ऑनलाइन पेमेंट होत नाही? एनपीसीआयने सांगितला उपाय

UPI not working for you : ऑनलाईन पेमेंट सुविधा देणाऱ्या अनेक कंपन्यांची यूपीआय सेवा आज ठप्प पडली. एनपीसीआयने ग्राहकांना यावर पर्याय दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:59 IST2025-04-01T15:46:17+5:302025-04-01T15:59:38+5:30

UPI not working for you : ऑनलाईन पेमेंट सुविधा देणाऱ्या अनेक कंपन्यांची यूपीआय सेवा आज ठप्प पडली. एनपीसीआयने ग्राहकांना यावर पर्याय दिला आहे.

UPI Payments To Be Disabled For Certain Users Starting April 1 | तुमच्या मोबाईलवरुनही ऑनलाइन पेमेंट होत नाही? एनपीसीआयने सांगितला उपाय

तुमच्या मोबाईलवरुनही ऑनलाइन पेमेंट होत नाही? एनपीसीआयने सांगितला उपाय

UPI not working for you : तुम्हालाही ऑनलाइन पेमेंटमध्ये समस्या येत आहेत का? काळजी करू नका, अडचण येणारे तुम्ही एकटेच नाही आहात. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली. काही बँकांचे आर्थिक वर्षाच्या अखेरीस सर्व्हर ठप्प पडल्याने यूपीआय पेमेंट करण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले. समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रभावित बँकांसोबत काम करत असल्याची माहिती एनपीसीआयने ग्राहकांना दिली.

सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील त्यांच्या ग्राहकांना सेवा व्यत्ययाबद्दल माहिती देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आर्थिक वर्ष संपत असल्याने आमच्या डिजिटल सेवा ग्राहकांना ०१.०४.२०२५ रोजी दुपारी १:०० ते ०४:०० दरम्यान उपलब्ध राहणार नाहीत. आम्ही तुम्हाला अखंड सेवांसाठी UPI लाइट आणि एटीएम चॅनेल वापरण्याची विनंती करतो. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत."

UPI Lite वापरण्याचा सल्ला
UPI Lite हे NPCI ने UPI पिन न वापरता जलद आणि अखंड कमी मूल्याचे व्यवहार सुलभ करण्यासाठी सादर केलेले फिचर आहे. UPI Lite डिव्हाइसवरील वॉलेटमधून थेट व्यवहारांना परवानगी देऊन वापरकर्त्याचा अनुभव सुलभ करते. वापरकर्ते प्रति व्यवहार १,००० रुपयांपर्यंत पेमेंट करू शकतात. यामधून दिवसात फक्त ५००० रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येतात.

वाचा - ९९ वर्षांचा भाडेपट्टा संपल्यानंतर तुमच्या मालमत्तेचे काय होईल? काय सांगतो कायदा?

UPI Lite कसे सुरू करावे?

  • तुम्ही वापरत असलेले UPI अॅप उघडा (उदा., BHIM, Google Pay, PhonePe).
  • अॅपमधील UPI Lite पर्यायावर नेव्हिगेट करा.
  • UPI Lite शी लिंक करण्यासाठी तुमचे बँक खाते निवडा.
  • तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून इच्छित रक्कम (२,००० रुपयांपर्यंत) तुमच्या UPI Lite वॉलेटमध्ये लोड करा.
  • या प्रक्रियेच्या ऑथेंटिकेशनसाठी तुमचा UPI पिन प्रविष्ट करावा लागू शकतो.
  • यानंतर तुम्ही यूपीआयपेक्षाही वेगाने पेमेंट करू शकता.

Web Title: UPI Payments To Be Disabled For Certain Users Starting April 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.