Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतीय तरूणांमध्ये बेरोजगारीचा दर १३.८ टक्के; देशात प्रथमच मासिक आधारावर मोजणी

भारतीय तरूणांमध्ये बेरोजगारीचा दर १३.८ टक्के; देशात प्रथमच मासिक आधारावर मोजणी

या वर्षी एप्रिलमध्ये बेरोजगारी ५.१ टक्के राहिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 05:20 IST2025-05-16T05:20:40+5:302025-05-16T05:20:40+5:30

या वर्षी एप्रिलमध्ये बेरोजगारी ५.१ टक्के राहिली आहे.

unemployment rate among Indian youth at 13 point 8 percent | भारतीय तरूणांमध्ये बेरोजगारीचा दर १३.८ टक्के; देशात प्रथमच मासिक आधारावर मोजणी

भारतीय तरूणांमध्ये बेरोजगारीचा दर १३.८ टक्के; देशात प्रथमच मासिक आधारावर मोजणी

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशात प्रथमच मासिक आधारावर बेरोजगारीचा दर मोजण्यात आला असून, या वर्षी एप्रिलमध्ये बेरोजगारी ५.१ टक्के राहिली आहे. पुरुषांमध्ये बेरोजगारीचा दर ५.२ टक्के असून, महिलांमध्ये हे प्रमाण ५ टक्के आहे. या काळात देशभरात १५-२९ वयोगटातील लोकांमध्ये बेरोजगारीचा दर १३.८ टक्के होता. शहरी भागात बेरोजगारीचा दर १७.२ टक्के होता, तर ग्रामीण भागात तो १२.३ टक्के होता.

१५-२९ वयोगटातील महिलांमध्ये बेरोजगारीचा दर देशभरात (ग्रामीण आणि शहरी) १४.४ टक्के होता, तर शहरांमध्ये तो २३.७ टक्के आणि खेड्यांमध्ये १०.७ टक्के होता. देशात १५-२९ वयोगटातील पुरुषांमध्ये बेरोजगारीचा दर १३.६ टक्के नोंदवला गेला, तर शहरांमध्ये तो १५ टक्के आणि खेड्यांमध्ये १३ टक्के होता. एप्रिल २०२५ मध्ये १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये कामगार शक्ती सहभाग दर ५५.६ टक्के होता, असे आकडेवारीवरून दिसून आले आहे.

 

Web Title: unemployment rate among Indian youth at 13 point 8 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.