Lokmat Money > बिझनेस न्यूज > बेरोजगार गरीबांना श्रीमंतांचे डिलिव्हरी एजंट बनविले जातेय; डिलिव्हरी अ‍ॅपवर पीयूष गोयल यांची टीका

बेरोजगार गरीबांना श्रीमंतांचे डिलिव्हरी एजंट बनविले जातेय; डिलिव्हरी अ‍ॅपवर पीयूष गोयल यांची टीका

नवी दिल्ली येथे तीन दिवसांच्या 'स्टार्टअप महाकुंभ २०२५' च्या दुसऱ्या आवृत्तीला सुरुवात झाली. यावेळी ते उपस्थित होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 22:37 IST2025-04-03T22:37:38+5:302025-04-03T22:37:50+5:30

नवी दिल्ली येथे तीन दिवसांच्या 'स्टार्टअप महाकुंभ २०२५' च्या दुसऱ्या आवृत्तीला सुरुवात झाली. यावेळी ते उपस्थित होते.

Unemployed poor are being made delivery agents for the rich; Piyush Goyal criticizes delivery app | बेरोजगार गरीबांना श्रीमंतांचे डिलिव्हरी एजंट बनविले जातेय; डिलिव्हरी अ‍ॅपवर पीयूष गोयल यांची टीका

बेरोजगार गरीबांना श्रीमंतांचे डिलिव्हरी एजंट बनविले जातेय; डिलिव्हरी अ‍ॅपवर पीयूष गोयल यांची टीका

सध्या बाजारात ई कॉमर्स कंपन्यांची चलती आहे. लाखो लोकांना या कंपन्यांनी रोजगार दिला आहे. हे चांगले की वाईट यावर कोणी विचार केलेला नाही. कारण या नोकरीत महिन्याकाठी २० ते २५ हजार रुपये या डिलिव्हरी बॉयना सुटत आहेत. परंतू, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी या प्रकारच्या नोकरी देण्यावर आक्षेप नोंदविला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हे डिलिव्हरी अ‍ॅप बेरोजगार गरीबांना श्रीमंतांचे डिलिव्हरी एजंट बनवत आहेत. 

नवी दिल्ली येथे तीन दिवसांच्या 'स्टार्टअप महाकुंभ २०२५' च्या दुसऱ्या आवृत्तीला सुरुवात झाली. यावेळी ते उपस्थित होते. भारतीयांनी जागतिक पातळीवर जाऊन मोठा विचार करण्याची गरज आहे. इतर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना जगात आपली ओळख बनवावी, असे ते म्हणाले. 

जेव्हा आपण डीप टेककडे पाहतो तेव्हा इकोसिस्टममध्ये फक्त १००० स्टार्टअप्स आहेत. अल्पावधीत संपत्ती निर्मितीवर लक्ष केंद्रित करायचे की आंतरराष्ट्रीय पातळीवर जायचे हे स्टार्टअप्सनी ठरवायला हवे. भारतीय स्टार्टअप्स फुड डिलिव्हरी आणि वेगाने वस्तूंच्या डिलिव्हरीवर लक्ष केंद्रीत करत आहेत. बेरोजगार तरुणांना श्रीमंतांसाठी डिलिव्हरी एजंट बनवत आहेत. हे अ‍ॅप्स बेरोजगार तरुणांना स्वस्त कामगार बनवत आहेत. यामुळे श्रीमंत घराबाहेर न पडता त्यांचे जेवण त्यांना मिळत आहे, असे गोयल म्हणाले. 

स्टार्टअप महाकुंभ २०२५ मध्ये सुमारे ३००० स्टार्टअप्स सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. ६४ देशांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले आहेत. भारतात सुमारे १.६ लाख स्टार्टअप्सना उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने (DPIIT) मान्यता दिली आहे. १६ जानेवारी २०२५ रोजी स्टार्टअप इंडियाची ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. 

Web Title: Unemployed poor are being made delivery agents for the rich; Piyush Goyal criticizes delivery app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.