मराठी उद्योजकांना जागतिक स्तरावर नेणाऱ्या ‘Train the Eximpreneur’ या उपक्रमाचे १० वे सत्र नेस्को, मुंबई येथे भव्य उत्साहात पार पडले. महाराष्ट्राच्या विविध भागांतून दोन हजारांहून अधिक मराठी युवक, व्यावसायिक आणि कौटुंबिक व्यवसाय करणारे उद्योजक या कार्यक्रमासाठी एकत्र आले होते.
या विशेष सत्रातील सर्वात अभिमानाची घोषणा म्हणजे डॉ. ओमकार हरी माळी यांच्या प्रशिक्षणातून पुढे आलेल्या १०६ मराठी उद्योजकांनी मिळून साधलेले ₹१०३ कोटींचे व्यावसायिक यश. या यशोगाथा मंचावर सादर होताच सभागृहात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमात डॉ. ओमकार यांनी निर्यात–आयात क्षेत्रासाठी आवश्यक असलेला संपूर्ण रोडमॅप मराठीतून, सोप्या आणि सुस्पष्ट पद्धतीने स्पष्ट केला. योग्य उत्पादन शोधणे, कागदपत्रांची तयारी, कायदेशीर प्रक्रिया, पहिली निर्यात, जागतिक मागणी समजून घेणे, या सर्व टप्प्यांचे प्रत्यक्ष आणि मार्गदर्शक स्वरूपात सादरीकरण करण्यात आले. त्यांनी सांगितले की माहिती जर मातृभाषेत मिळाली, तर गुंतागुंत कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो.
या १० व्या सत्रात एक अनोखी आणि खूप चर्चेत राहिलेली पैसे जाळण्याची (money-burning) अॅक्टिव्हीटी घेण्यात आली. आर्थिक भीती, मानसिक अडथळे आणि जुन्या मर्यादित विश्वासांना सोडून देण्यासाठी ही क्रिया प्रतीकात्मक पद्धतीने आयोजित केली गेली. अनेक सहभागींसाठी हा क्षण अत्यंत मुक्त करणारा ठरला. त्यांच्या मते, या कृतीमुळे मनातील दडपण, संकोच आणि पैसे कमावण्याशी जोडलेली नकारात्मक ऊर्जा हलकी झाली आणि नव्या शक्यतांसाठी मन तयार झाले.
डॉ. ओमकार यांनी स्पष्ट केले की यशस्वी व्यवसाय उभा करणे हे केवळ तांत्रिक ज्ञानावर अवलंबून नसून मानसिक आणि आध्यात्मिक अलाईनमेंट तितकेच महत्त्वाचे आहे. आपण स्वतःला कमी समजणे, धोका घेण्याची भीती आणि पैशांबद्दलच्या चुकीच्या समजुती हे अडथळे काढले तरच उद्योजक पुढे मोठी पावले टाकू शकतात. या मानसिक अडथळ्यांना सोडवण्यासाठी कार्यक्रमाच्या सुरुवातीला घेण्यात आलेली अॅक्टिव्हिटी सहभागींसाठी मानसिक रीसेट ठरली.
१०६ उद्योजकांच्या सादर झालेल्या कथा हेच सिद्ध करत होत्या की योग्य माईंडसेट, स्पष्ट दिशा आणि सातत्य यांच्या साहाय्याने जागतिक बाजारपेठेत मराठी तरुण नक्कीच मोठे यश मिळवू शकतात.
या १० व्या सत्रामुळे Udyami Maharashtra या व्यापक मिशनलाही नवा वेग मिळाला आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट पुढील काही वर्षांत एक लाख मराठी उद्योजक घडवणे, त्यांना निर्यात–आयात, एआय आधारित व्यवसाय आणि स्वतंत्र डिजिटल मॉडेल्समध्ये सक्षम करणे आहे. महाराष्ट्राची निर्यात २०२३–२४ मध्ये ५.५६ लाख कोटींवर पोहोचली असून देशातील औद्योगिक उत्पादनात राज्याचा वाटा सर्वाधिक आहे. डॉ. ओमकार यांनी सांगितले की या संधींचा लाभ मराठी लोकांनी मोठ्या प्रमाणात घ्यायला हवा.
नेस्कोतील उत्साहपूर्ण सत्रानंतर पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि नवी मुंबई येथे Train the Eximpreneur ची पुढील सत्रे आयोजित केली जाणार आहेत. पुढील दशकात आणखी अनेक मराठी उद्योजक जागतिक पातळीवर झेप घेतील, असा विश्वास डॉ. ओमकार यांनी व्यक्त केला.
