New Aadhaar App :आधार कार्डची झेरॉक्स प्रत कोणाशीही शेअर करणे आता तुमच्या वैयक्तिक डेटासाठी धोकादायक ठरू शकते. ही वाढती जोखीम ओळखून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने एक नवीन आणि प्रगत 'Aadhaar App' लाँच केले आहे. जुना मोबाईल नंबर बंद असला किंवा इंटरनेट नसेल, तरीही या अॅपच्या मदतीने तुमची महत्त्वाची कामे आता विनासायास आणि पूर्णपणे सुरक्षितपणे पार पडणार आहेत.
आता डिजिटल ओळखीचा नवा काळ
वारंवार इशारा देऊनही नागरिक आपली महत्त्वाची माहिती असलेल्या आधारची फोटोकॉपी सर्रास वाटत आहेत, ज्याचा गैरवापर होण्याचे प्रमाण वाढले आहे. नवीन आधार अॅपचा मुख्य उद्देश तुमची डिजिटल ओळख अधिक सुरक्षित आणि तुमच्या नियंत्रणात ठेवणे हा आहे.
नवीन अॅपची ५ महत्त्वाची वैशिष्ट्ये
- ऑफलाईन व्हेरिफिकेशन : या अॅपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आता आधार पडताळणीसाठी इंटरनेटची गरज भासणार नाही. बायोमेट्रिक किंवा आधार नंबर शेअर न करताही तुम्ही तुमची ओळख सिद्ध करू शकता.
- घरबसल्या मोबाईल नंबर आणि पत्ता अपडेट : तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा पत्ता बदलायचा असल्यास आता आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही. अॅपमधील 'Update Aadhaar Details' सेक्शनमध्ये जाऊन नाममात्र शुल्कात तुम्ही ही माहिती अपडेट करू शकता.
- क्युआर कोड स्कॅनिंग : हॉटेल किंवा ऑफिसमध्ये ओळख पटवण्यासाठी फक्त क्युआर कोड स्कॅन करून काम होईल. यामुळे तुम्हाला कोणताही कागद किंवा फोटोकॉपी देण्याची गरज उरणार नाही.
- शेअर आयडी फीचर : या फीचरद्वारे तुम्ही पासवर्डने सुरक्षित असलेली फाईल तयार करू शकता. यामध्ये तुम्हाला हवी तितकीच माहिती (उदा. फक्त नाव किंवा वय) समोरच्या व्यक्तीला दाखवता येईल.
वाचा - दूध आणि मासळी उत्पादनात भारताचा डंका! 'ब्लू इकॉनॉमी' ठरणार भारताच्या जीडीपीचा नवा कणा
- एकाच अॅपमध्ये ५ प्रोफाईल : या अॅपमध्ये तुम्ही स्वतःच्या आधारसोबतच घरातील मुले किंवा इतर सदस्यांची मिळून एकूण ५ आधार प्रोफाईल मॅनेज करू शकता.
