Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आधारवर नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी फक्त 'ही' कागदपत्रे आवश्यक, UIDAI चा मोठा बदल

आधारवर नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी फक्त 'ही' कागदपत्रे आवश्यक, UIDAI चा मोठा बदल

Aadhar Update : आधार कार्ड दुरुस्तीसाठी यूआयडीएआयने नवीन नियम लागू केले आहेत. ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी अद्ययावत करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 11:34 IST2025-11-27T11:20:40+5:302025-11-27T11:34:43+5:30

Aadhar Update : आधार कार्ड दुरुस्तीसाठी यूआयडीएआयने नवीन नियम लागू केले आहेत. ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी अद्ययावत करण्यात आली आहे.

UIDAI Announces New Aadhaar Update Rules 2025 Single Document Now Valid for Name, Address, and DOB Changes | आधारवर नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी फक्त 'ही' कागदपत्रे आवश्यक, UIDAI चा मोठा बदल

आधारवर नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी फक्त 'ही' कागदपत्रे आवश्यक, UIDAI चा मोठा बदल

Aadhar Update : तुम्हाला जर तुमच्या आधार कार्डमध्ये कोणताही बदल करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने आधार कार्डातील नावनोंदणी आणि दुरुस्तीच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार, ओळख, पत्ता, नातेसंबंध किंवा जन्मतारीख सिद्ध करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रांची यादी अद्ययावत करण्यात आली आहे. ही नवीन यादी लहान मुले, प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटांसाठी लागू असेल.

नाव बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
नाव दुरुस्त करण्यासाठी UIDAI अनेक ओळखपत्रे स्वीकारते.
सर्वाधिक विश्वसनीय : पासपोर्ट हा सर्वात विश्वसनीय मानला जातो, कारण त्यात फोटो, नाव, जन्मतारीख आणि पत्ता एकत्र असतो.
इतर मान्य दस्तावेज : पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी ओळखपत्र आणि विवाह प्रमाणपत्र देखील नाव अपडेट करण्यासाठी स्वीकारले जातात.

पत्ता बदलण्यासाठी लागणारे दस्तऐवज
पासपोर्ट, बँक पासबुक/बँक स्टेटमेंट (अद्ययावत), वीज-पाणी-गॅसची बिले (जे तीन महिन्यांच्या आत जारी केलेले असावेत).
भाड्याने राहणाऱ्यांसाठी भाडेकरार सोबत पोलीस पडताळणी किंवा नोटरीची प्रत आवश्यक असते.
मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, हाऊस टॅक्स/प्रॉपर्टी टॅक्सची पावती ही कागदपत्रे देखील पत्ता अपडेट करण्यासाठी वैध आहेत.

जन्मतारीख कशी अपडेट करावी?

  • जन्म प्रमाणपत्र
  • पासपोर्ट
  • १०वी/१२वी ची मार्कशीट
  • फिजिकल पॅन कार्ड (ई-पॅन स्वीकारले जात नाही).
  • ज्या कोणत्याही सरकारी ओळखपत्रावर तुमची जन्मतारीख स्पष्टपणे नमूद केलेली आहे, ते वापरले जाऊ शकते.

आधार अपडेटची नवीन आणि मोठी सुविधा

  • यूआयडीएआयच्या नवीन नियमांनुसार, आता एकाच कागदपत्रात फोटो, नाव आणि पत्ता हे तिन्ही तपशील असल्यास, ते आधार अपडेटसाठी पुरेसे मानले जाईल.
  • पूर्वी प्रत्येक तपशिलासाठी वेगवेगळे पुरावे सादर करणे आवश्यक होते.
  • आता एकाच कागदपत्राद्वारे प्रक्रिया पूर्ण करता येईल, ज्यामुळे नाव बदलणे, पत्ता सुधारणे, जन्मतारीख अपडेट करणे किंवा नातेसंबंध जोडणे हे सर्व काम सोपे झाले आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा
अपडेटसाठी दिलेले सर्व दस्तावेज मूळ आणि स्पष्ट असावेत. कोणत्याही प्रकारची खाडाखोड, ओव्हररायटिंग किंवा बदल आढळल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो.
आधारमधील काही माहिती मर्यादित वेळाच बदलण्याची परवानगी आहे. नाव फक्त दोनदा, तर जन्मतारीख आणि लिंग फक्त एकदाच बदलता येते.

वाचा - कोट्यवधी कर्जदारांना RBI चा मोठा दिलासा! क्रेडिट स्कोअरबाबत मोठा निर्णय; कर्ज आणि EMI त्वरित होईल स्वस्त!

ज्या तपशिलात बदल करायचा आहे, त्याचे योग्य दस्तऐवज तयार ठेवा. तुमच्या जवळच्या आधार नोंदणी/अपडेट केंद्रावर जा किंवा myAadhaar पोर्टलद्वारे ऑनलाइन प्रक्रिया तपासा. दुरुस्ती पूर्ण झाल्यावर नवीन आधार कार्ड तुमच्या पत्त्यावर पाठवले जाईल.
 

Web Title : आधार अपडेट: नाम, पता, जन्मतिथि बदलने के लिए ज़रूरी दस्तावेज़ सरल

Web Summary : UIDAI ने आधार अपडेट को सरल बनाया। नाम, पता, जन्मतिथि बदलने के लिए पासपोर्ट, पैन या जन्म प्रमाण पत्र का उपयोग करें। फोटो, नाम, पते वाला एक दस्तावेज पर्याप्त। मूल आवश्यक; सीमित बदलाव की अनुमति।

Web Title : Aadhaar Update: Documents Needed for Name, Address, DOB Change Simplified

Web Summary : UIDAI simplifies Aadhaar updates. Use passport, PAN, or birth certificate for name, address, or date of birth changes. One document with photo, name, address sufficient. Originals required; limited changes allowed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.