जर तुम्ही तुमच्या जुन्या फायर टीव्ही स्टिकवर नेटफ्लिक्सचा आनंद घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जून २०२५ पासून जुन्या फायर टीव्ही डिव्हाइसवर नेटफ्लिक्स काम करणं बंद करेल अशी माहिती कंपनीनं दिलीये. यामध्ये सर्वात जुने फायर टीव्ही स्टिक, फायर टीव्ही आणि व्हॉईस रिमोट डिव्हाइसेसचा समावेश आहे. हा बदल सध्या अमेरिकेत लागू होणार असला तरी भविष्यात इतर देशांमध्ये ही योजना लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय म्हटलंय नेटफ्लिक्सनं?
नेटफ्लिक्सचे म्हणणे आहे की, नवीन सुरक्षा आणि अॅडव्हान्स्ड फीचर्सना सपोर्ट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जुन्या डिव्हाइसमध्ये तांत्रिक त्रुटी असतात ज्यामुळे हॅकिंगचा धोका वाढू शकतो. म्हणूनच नेटफ्लिक्स लेटेस्ट फायर टीव्हीवर अपग्रेड करावं असशी कंपनीची इच्छा आहे. यामुळेच अॅमेझॉननं या बदलाची माहिती आधीच घेतली असून आता नवीन फायर टीव्ही मॉडेल्सवर विशेष सूट दिली जात आहे.
जर तुम्ही तुमच्या जुन्या फायर टीव्ही स्टिकवर नेटफ्लिक्सचा आनंद घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
मस्क यांनी उगाचच नाही सोडली ट्रम्प यांची साथ; 'ही' कंपनी बनली कारण; वाढवलं टेन्शन
हे काही नवीन नाही. टेक कंपन्या वेळोवेळी जुन्या डिव्हाइसेसचा सपोर्ट बंद करतात. नवीन फीचर्सची गुणवत्ता सुधारण्यासाठी व्हॉट्सअॅप वेळोवेळी जुन्या अँड्रॉइड आणि आयओएस फोनवर काम करणं थांबवतं.
अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ
आता अॅमेझॉन प्राईम व्हिडिओबद्दल बोलायचं झालं तर भारतातील त्याच्या युजर्सना आणखी एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. १७ जून २०२५ पासून अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर वेब शो आणि चित्रपटांच्या दरम्यान जाहिराती दिसू लागतील. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, जर युजर्सना जाहिरातींशिवाय कंटेंट पाहायचा असेल तर त्यांना सध्याच्या प्राइम सब्सक्रिप्शनव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम द्यावी लागेल.
अॅमेझॉन गेल्या वर्षभरापासून भारतात या अॅड-टियर मॉडेलची चाचणी घेत आहे आणि आता त्याची अधिकृत अंमलबजावणी केली जात आहे. आता स्ट्रीमिंग सेवाही टीव्हीप्रमाणेच अॅड फ्री आणि अॅड्स असलेल्या पॅकेजमध्ये विभागली जात असल्याचं स्पष्ट झालं आहे.