Lokmat Money > बिझनेस न्यूज > ट्रम्प यांना मोठा झटका! जगाला टॅरिफची धमकी देणारा अमेरिका स्वतः मंदीच्या उंबरठ्यावर; मूडीजचा इशारा

ट्रम्प यांना मोठा झटका! जगाला टॅरिफची धमकी देणारा अमेरिका स्वतः मंदीच्या उंबरठ्यावर; मूडीजचा इशारा

US Recession Warning: जगावर टॅरिफ बॉम्ब टाकून आपली ताकद दाखवणारा अमेरिका स्वतःच गंभीर मंदीच्या उंबरठ्यावर आहे. हा इशारा दुसरातिसरा कोणी दिला नसून मूडीजने दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 11:28 IST2025-09-03T11:27:53+5:302025-09-03T11:28:54+5:30

US Recession Warning: जगावर टॅरिफ बॉम्ब टाकून आपली ताकद दाखवणारा अमेरिका स्वतःच गंभीर मंदीच्या उंबरठ्यावर आहे. हा इशारा दुसरातिसरा कोणी दिला नसून मूडीजने दिला आहे.

Trump's Tariffs Backfire as Moody's Predicts US Economic Downturn | ट्रम्प यांना मोठा झटका! जगाला टॅरिफची धमकी देणारा अमेरिका स्वतः मंदीच्या उंबरठ्यावर; मूडीजचा इशारा

ट्रम्प यांना मोठा झटका! जगाला टॅरिफची धमकी देणारा अमेरिका स्वतः मंदीच्या उंबरठ्यावर; मूडीजचा इशारा

US Recession Warning : एका बाजूला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगातील विविध देशांवर 'टॅरिफ बॉम्ब' टाकून मोठ्या आर्थिक यशाचा दावा करत आहे. अशात जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने त्यांना मोठा झटका दिला आहे. आपल्या ताज्या अहवालात मूडीजने अमेरिकेला गंभीर मंदीचा इशारा दिला आहे. मूडीजच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन अर्थव्यवस्थेचा एक तृतीयांश हिस्सा आधीच संकटात सापडला आहे. हा इशारा केवळ ट्रम्प यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण अमेरिकेसाठी एक वाईट बातमी आहे.

मूडीजच्या मुख्य अर्थतज्ज्ञांचा इशारा
मूडीज ॲनालिटिक्सचे मुख्य अर्थतज्ज्ञ मार्क झँडी यांनी अमेरिकेला इशारा देताना म्हटले आहे की, राज्य-स्तरीय आकडेवारीवरून अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यांच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, अमेरिकेच्या एकूण जीडीपीच्या (सकल देशांतर्गत उत्पादन) जवळपास एक तृतीयांश हिस्सा असलेले राज्य एकतर मंदीच्या विळख्यात सापडले आहेत किंवा मंदीच्या मोठ्या जोखमीत आहेत.

अहवालात झँडींच्या हवाल्याने म्हटले आहे की, अमेरिकेच्या जीडीपीचा एक तृतीयांश हिस्सा ज्या राज्यांतून येतो, ती राज्ये मंदीतून जात आहेत किंवा मंदीच्या धोक्यात आहेत. एक तृतीयांश राज्यांची वाढ स्थिर दिसत आहे, तर केवळ उरलेल्या एक तृतीयांश राज्यांमध्येच वाढ नोंदवली जात आहे.

‘ट्रम्प यांचे धोरण फायद्याऐवजी नुकसानीचे’
मूडीजच्या अर्थतज्ज्ञांचे मत आहे की, अमेरिका आणखी एका मंदीच्या उंबरठ्यावर उभा आहे, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. अलीकडेच आलेल्या रॉयटर्सच्या अहवालातही अमेरिकन अर्थव्यवस्थेतील मंदीच्या धोक्याचे संकेत दिले गेले आहेत. यात म्हटले आहे की, ऑगस्ट २०२५ मध्ये अमेरिकेचा मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय (उत्पादन खरेदी व्यवस्थापक निर्देशांक) घटून ४८.७ वर आला आहे. देशातील कारखान्यांची स्थिती ‘US Great Recession’ च्या काळापेक्षाही बिकट असल्याचे सांगितले जात आहे.

अहवालानुसार, ऑगस्ट महिन्यात अमेरिकेच्या उत्पादन क्षेत्रात सलग सहाव्या महिन्यात मोठी घसरण नोंदवली गेली. याचे कारण ट्रम्प प्रशासनाच्या आयात शुल्काचे (टॅरिफ) दुष्परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच, हे शुल्क फायद्याऐवजी नुकसान करणारे सिद्ध होत आहेत. काही उत्पादकांनी तर सद्यस्थितीला 'महामंदी' पेक्षाही वाईट म्हटले आहे. इन्स्टिट्यूट फॉर सप्लाय मॅनेजमेंटच्या सर्वेक्षणानेही हेच सिद्ध केले आहे.

वाचा - झोमॅटोचा झटका! सणासुदीत प्लॅटफॉर्म फीमध्ये २०% वाढ; आता प्रत्येक ऑर्डरवर इतके रुपये मोजावे लागणार

या सर्व संकेतांवर आणि आकडेवारीवर दुर्लक्ष करूनही डोनाल्ड ट्रम्प मात्र आपल्या व्यापार धोरणाचे समर्थन करत आहेत. टॅरिफला देशाच्या हिताचे पाऊल सांगत, दीर्घकाळापासून घटत चाललेल्या अमेरिकेच्या औद्योगिक पायाला पुन्हा जिवंत करण्यासाठी हे आवश्यक असल्याचे ते म्हणत आहेत.
 

Web Title: Trump's Tariffs Backfire as Moody's Predicts US Economic Downturn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.