Lokmat Money > बिझनेस न्यूज > ट्रम्प टॅरिफचा निर्यातीला मोठा फटका, आणखी तीव्र घसरण दिसू शकते

ट्रम्प टॅरिफचा निर्यातीला मोठा फटका, आणखी तीव्र घसरण दिसू शकते

अमेरिकी शुल्काचा परिणाम असमान असून काही क्षेत्रांना तीव्र फटका बसला आहे. औषधी आणि स्मार्टफोनसह सुमारे एकतृतीयांश निर्यात या शुल्कांपासून वाचली असली तरी उर्वरित मालावर वास्तविक परिणाम अपेक्षेपेपेक्षा खूपच जास्त आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 09:51 IST2025-09-18T09:50:41+5:302025-09-18T09:51:54+5:30

अमेरिकी शुल्काचा परिणाम असमान असून काही क्षेत्रांना तीव्र फटका बसला आहे. औषधी आणि स्मार्टफोनसह सुमारे एकतृतीयांश निर्यात या शुल्कांपासून वाचली असली तरी उर्वरित मालावर वास्तविक परिणाम अपेक्षेपेपेक्षा खूपच जास्त आहे.

Trump tariffs hit exports hard, could see a sharper decline | ट्रम्प टॅरिफचा निर्यातीला मोठा फटका, आणखी तीव्र घसरण दिसू शकते

ट्रम्प टॅरिफचा निर्यातीला मोठा फटका, आणखी तीव्र घसरण दिसू शकते

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या ५० टक्के आयात शुल्कामुळे भारताची अमेरिकेला होणारी निर्यात ऑगस्टमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात घसरली आहे.

अमेरिकी शुल्काचा परिणाम असमान असून काही क्षेत्रांना तीव्र फटका बसला आहे. औषधी आणि स्मार्टफोनसह सुमारे एकतृतीयांश निर्यात या शुल्कांपासून वाचली असली तरी उर्वरित मालावर वास्तविक परिणाम अपेक्षेपेपेक्षा खूपच जास्त आहे. ऑगस्टमध्ये ७तारखेला शुल्क २५ टक्के आणि २७तारखेला ५० टक्क्यांवर पोहोचल्याने निर्यातीला खरा फटका बसला.

निर्यातदारांना जुळवून घेण्याची फारशी संधीच मिळाली नाही. सप्टेंबरमध्ये संपूर्ण महिनाभर ५० टक्के दर लागू असल्याने आणखी तीव्र घसरण दिसू शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

१५.६२ सिंगापूर

१४.९ चीन

१३.९६ ब्रिटन

१२.१ सौदी अरेबिया

बांगलादेश

११.३२ १०.२३

जर्मनी

७९.४४

अमेरिका

(२०२४ ची आकडेवारी, निर्यात अब्ज डॉलर्समध्ये)

३७.१ यूएई

२४.२२

नेदरलँड्स

८.३३

इटली

भारताची एकूण निर्यात

४३४.४४

२०२४

३४९.३५

२०२५

आकडे अब्ज डॉलर्समध्ये

धोरणात्मक प्रश्न

अमेरिकेच्या तीव्र आयात शुल्कास तोंड देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्याचे आव्हान आता सरकारपुढे निर्माण झाले आहे.

ऑगस्टमध्ये अमेरिकेला होणारी निर्यात १६.३ टक्क्यांनी कमी होऊन ६.७ अब्ज डॉलरवर आली. ही २०२५ मधील सर्वाधिक मासिक घसरण ठरली.

जुलैमध्ये जूनच्या तुलनेत ३.६ टक्के घसरण होऊन निर्यात ८.० अब्ज डॉलरवर आली. जूनमध्ये मेच्या तुलनेत ५.७ टक्के घट होऊन आकडा ८.३ अब्ज डॉलरवर पोहोचला.

वाहन क्षेत्राला फटका ?

अमेरिकेने लावलेल्या भरमसाट आयात शुल्कामुळे देशातील वाहनांच्या सुट्या भागांचे उत्पादन सुमारे आठ टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता आहे, असे मानक संस्था 'इक्रा'ने सांगितले. भारतीय वाहन सुटे भाग निर्यातदार इतर आशियाई देशांच्या तुलनेत स्पर्धात्मकदृष्ट्या कमकुवत स्थितीत आहेत. ही बाब द्विपक्षीय व्यापार कराराची गरज अधोरेखित करते.

Web Title: Trump tariffs hit exports hard, could see a sharper decline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.