शेअर बाजारातील 'गोकलदास एक्सपोर्ट्स लिमिटेड'च्या शेअरमध्ये गुरुवारी (८ जानेवारी) १२ टक्क्यांहूनही अधिकची घसरण दिसून आली आहे. एप्रिल २०२० नंतरची ही एका दिवसातील सर्वात मोठी घसरण असून, हा शेअर ऑगस्ट २०२३ नंतरच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या सहा सत्रांपैकी पाच सत्रांत या शेअरमध्ये घसरण झाली आहे. तसेच गेल्या पाच आठवड्यांत केवळ पाच दिवसच या शेअरमध्ये तेजी दिसू आली आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले आहे.
केवळ गोकलदासच नव्हे, तर इतर काही निर्यातदार कंपन्याही दबावात आहेत. यात अवंती फीड्स, पर्ल ग्लोबल आणि एपेक्स फ्रोजन फूड्स यांसारख्या निर्यातदार कंपन्यांच्या शेअर्समध्येही ३ ते ७ टक्क्यांची घसरण दिसून येते. अमेरिकेसोबतच्या व्यापारी कराराबाबतची अनिश्चितता हे याचे मुख्य कारण मानले जात आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकन बाजारपेठेसाठी वार्षिक कंत्राटे अंतिम केली जातात, मात्र सध्या कसलेही चित्र स्पष्ट नसल्याने गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले आहे. या कंपन्या, लवकरच आपल्या तिसऱ्या तिेमाही (Q3) चे निकाल जारी करणार आहे. यामुळे शेअरमधील नफेखोरी वाढळी आहे.
सध्या भारतीय निर्यातीवर अमेरिकेत सुमारे ५० टक्के टॅरिफ लावला जात आहे. गोकलदास, पर्ल ग्लोबल आणि वेलस्पन लिविंग यांसारख्या कंपन्यांची ५० ते ७० टक्के कमाई अमेरिकेतून येते. याशिवाय, अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी रशियन तेल खरेदीच्या पार्श्वभूमीवर ५०० टक्क्यांपर्यंतच्या टॅरिफ संदर्भात केलेल्या भाष्यामुळेही, निर्यात क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोकलदास एक्सपोर्ट्समध्ये आज २० लाख हून अधिक शेअर्सची उलाढाल झाली. सध्या हा शेअर ₹६०४.७ वर व्यवहार करत आहे. हा शेअर आपल्या 52-आठवड्यांच्या ₹1,144 या उच्चांकावरून साधारणपणे 47% तर ढिसेंबर 2024 च्या विक्रमी ₹1,262 या उच्चांकावरून जवळपास 53% घसरला आहे. युरोपियन युनियन सारख्या पर्यायी बाजारपेठांकडेही आपले लक्ष वळवत आहेत.
