lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ...अन्यथा व्होडाफोन अन् आयडियाला लागू शकतं टाळं

...अन्यथा व्होडाफोन अन् आयडियाला लागू शकतं टाळं

ऐतिहासिक तोट्यात असलेली टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 10:37 AM2019-11-18T10:37:24+5:302019-11-18T10:37:57+5:30

ऐतिहासिक तोट्यात असलेली टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे.

total agr liability of vodafone idea will increase and could be 54200 crores | ...अन्यथा व्होडाफोन अन् आयडियाला लागू शकतं टाळं

...अन्यथा व्होडाफोन अन् आयडियाला लागू शकतं टाळं

नवी दिल्लीः ऐतिहासिक तोट्यात असलेली टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. व्होडाफोन-आयडिया कंपनीच्या AGR (समायोजित एकूण कमाई)मधील तोट्याच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता असून, तो तोटा 54,200 कोटी रुपयांच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कंपनीच्या एकूण ताळेबंदावर त्याचा परिणाम जाणवणार आहे. टेलिकॉम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, व्होडाफोन-आयडियाचा तोटा आणखी वाढल्यास कंपनीला टाळंही ठोकावं लागू शकतं.
 
ICICI सिक्युरिटीजनं सांगितलं की,  तोटा वाढल्यास व्होडाफोनला व्याज आणि दंडाच्या स्वरूपात AGR संबंधित 54,200 कोटी रुपये भरावे लागू शकण्याचा दुसरा एक अंदाज आहे. जर ही गणना दुसऱ्या पद्धतीनं करण्याचा विचार केल्यास AGR संबंधी भरावयाच्या रकमेत मोठी वाढ होऊ शकते. भारतीय औद्योगिक इतिहासातील सर्वांत वाईट तिमाही नुकसान सोसल्यानंतर व्होडाफोन-आयडियाने सरकारकडे मदतीची याचना केली होती. कंपनीला कोसळण्यापासून वाचविण्यासाठी मदत मिळणे आवश्यक असल्याचे कंपनीने म्हटले होते.

मागील कराच्या थकबाकीपोटी भारत सरकारने कंपनीला 4 अब्ज डॉलरचा भरणा करण्यास सांगितलेले आहे. त्यातच सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत कंपनीला तब्बल 509 अब्ज रुपयांचा (7.1 अब्ज डॉलर) अभूतपूर्व तोटा झाला आहे. 2017पासून कंपनीला नफाच झालेला नाही. व्होडाफोन-आयडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनी चालू राहणे हे आता केवळ सरकारच्या मदतीवरच अवलंबून आहे. आर्थिक मदत मिळावी यासाठी कंपनी सरकारसोबत सक्रिय चर्चाही करीत आहे. कंपनीवर 14 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. जिओच्या आगमनानंतर या कंपनीला मोठा फटका बसला.

Web Title: total agr liability of vodafone idea will increase and could be 54200 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.