Lokmat Money > बिझनेस न्यूज > NPS आणि अटल पेन्शन योजनेच्या नावावर स्कॅम; तुम्हाला तर असा कॉल किंवा SMS आला नाही ना?

NPS आणि अटल पेन्शन योजनेच्या नावावर स्कॅम; तुम्हाला तर असा कॉल किंवा SMS आला नाही ना?

Cyber Crime : सायबर फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. घोटाळे करणारे एनपीएस आणि अटल पेन्शन योजनेच्या ग्राहकांना लक्ष्य करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 17:21 IST2025-02-17T17:21:10+5:302025-02-17T17:21:10+5:30

Cyber Crime : सायबर फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. घोटाळे करणारे एनपीएस आणि अटल पेन्शन योजनेच्या ग्राहकांना लक्ष्य करत आहेत.

this is how fraud is happening in the name of nps and atal pension yojana | NPS आणि अटल पेन्शन योजनेच्या नावावर स्कॅम; तुम्हाला तर असा कॉल किंवा SMS आला नाही ना?

NPS आणि अटल पेन्शन योजनेच्या नावावर स्कॅम; तुम्हाला तर असा कॉल किंवा SMS आला नाही ना?

Cyber Crime : वाढत्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये माणसाचं आयुष्य जेवढं सुखकर झालं आहे, तेवढाच धोकाही वाढला आहे. गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्हेगारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हे प्रकार रोखण्यासाठी सरकारने थेट मोबाईलच्या कॉलरट्यूनआधी सायबर अलर्ट देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यानंतर या घटना थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. आता अशाच एका नवीन स्कॅमला लोक बळी पडत आहेत. राष्ट्रीय पेन्शन योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या सरकारी पेन्शन योजनांद्वारे लोकांना लक्ष्य केले जात आहे. या योजनांच्या नावाखाली लोकांची बँक खाती रिकामी केली जात आहे.

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने सांगितले की, घोटाळे करणारे राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम आणि अटल पेन्शन योजनेचे बनावट लेआउट तयार करून फसवणूक करत आहेत. पीएफआरडीएने एसएमएस कॉल, ई-मेल, वेबसाइट आणि मोबाइल ॲपद्वारे एनपीएसशी संबंधित माहितीवर विश्वास ठेवू नका असे म्हटले आहे. एनपीएसची पूर्ण निधी काढता येत नाही. मात्र, या माहितीचा गैरफायदा घेत सायबर ठग लोकांना गंडा घालत आहेत. या योजनेतील निधी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन लोकांची फसवणूक केली जात आहे.

  • कशी होते फसवणूक

लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींकडून सरकारी योजनांची हुबेहुब नक्कल केली जात आहे. तसेच ईमेल आयडीशी सरकारनी नावाने तयार केले जात आहे. पीडित व्यक्ती या बनावाला बळी पडत आहेत.

PFRDA च्या वतीने सांगण्यात आले की अधिकृत वेबसाइट www.pfrda.org.in ही आहे. परंतु, घोटाळेबाज बनावट डोमेनच्या वेबसाइटद्वारे लोकांची फसवणूक करतात.

या योजने संबंधीचा कुठलाही संदेश केवळ पीएफआरडीएआयच्या आयडीद्वारे पाठविला जात असल्याचे संस्थेने स्पष्ट केले. जर तुम्हाला संदेशाच्या विषयावर NPS/APS/ लिहिलेले दिसले तर त्यावर विश्वास ठेवू नका. अन्यथा तुम्ही सायबर गुन्ह्याला बळी पडू शकता, असे आवाहन PFRDA ने केलं आहे.

  • अधिकृत हेल्पलाइन

याशिवाय PFRDA ने अटल पेन्शन योजना आणि NPS शी संबंधित कोणतीही तक्रार नोंदवण्यासाठी अधिकृत हेल्पलाइन नंबर आणि SMS क्रमांक जारी केला आहे. एनपीएससाठी कॉल सेंटर 1800 110 708 आणि एसएमएससाठी 56677 या क्रमांकाचा वापर करावा. तसेच अटल पेन्शन योजनेसाठी 1800 110 069 क्रमांक जारी करण्यात आला आहे.

Web Title: this is how fraud is happening in the name of nps and atal pension yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.