Bill Gates Artificial Intelligence and Job Loss: सध्या सगळीकडे आर्टिशियल इंटेलिजन्सची जोरात चर्चा होत आहे. वेगवेगळे एआय मॉडेल्स विकसित झाली आहेत. तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत असल्याने अनेक क्षेत्रात एआय मनुष्यबळाची जागा घेईल असे अंदाजही व्यक्त केले जात आहेत. कारण अनेक तासांचं काम एआय काही मिनिटांमध्ये करत आहेत. त्यामुळे नोकऱ्यांच्या संधी कमी होण्याचे संकट निर्माण होऊ शकते, असेही म्हटले जात आहे. पण, मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांनी एक भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते तीन क्षेत्रातील नोकऱ्या एआयला गिळंकृत करू शकणार नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बिल गेट्स यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले होते की, कृत्रिम बुद्धिमत्ता जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये माणसांची जागा घेईल. कारण जगभरात आता एआयचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
एआयमुळे कोणती नोकरी सर्वाधिक धोक्यात?
तंज्ञत्रान क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या मते एआयमुळे कोडर्सच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. एनवीदियाचे जेन्सन हुआंग, ओपन एआयचे सॅम ऑल्टमॅन आणि सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनिऑफ यांच्या मते एआयमुळे कोडरची नोकरी अजितबात सुरक्षित नाही. सगळ्यात आधी त्यांच्याच नोकऱ्या जातील.
हेही वाचा >>DeepSeek नंतर चीनने लॉन्च केले नवीन Ai असिस्टंट 'Manus', काय आहे खास?
या मताशी बिल गेट्स मात्र सहमत नाहीत. बिल गेट्स यांचे असे म्हणणे आहे की, हे काम सगळ्यात चांगल्या प्रकारे माणुसच करू शकतो. त्यामुळे कोडिंगच्या नोकरीमध्ये एआय नाही तर माणसांची भूमिकाच महत्त्वाची राहणार आहे.
आणखी कोणत्या नोकऱ्यांना नाही एआयचा धोका?
बिल गेट्स यांनी सांगितले की, एआय कितीही विकसित झाले तरी तो बॉयोलॉजिस्ट म्हणजे जीवशास्त्रज्ञांची जागा ते घेऊ शकणार नाही. आजाराचं निदान करणे, डीएनएचे विश्लेषण करणे यासारख्या कामांसाठी ते एक उपयोगी टूल म्हणून काम करेल. कारण यामध्ये वैज्ञानिक शोध लावण्याची क्षमता नाही.
त्याचबरोबर एनर्जी एक्सपर्ट्स म्हणजे ऊर्जा तज्ज्ञांची जागाही एआय घेऊ शकणार नाही. कारण हे क्षेत्र पूर्णपणे अद्यायावत होण्यासाठी खूपच किचकट आहे, असे बिल गेट्स यांनी म्हटले आहे.