भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी आहे. जुलैमध्ये रिचार्जच्या दरात बदल झाल्यापासून अनेक जण आपले नंबर बीएसएनएलवर पोर्ट करत आहेत. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे बीएसएनएलकडून देण्यात येणारे स्वस्त रिचार्ज प्लॅन. अशा परिस्थितीत जर तुम्हीही खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या महागड्या रिचार्ज प्लॅनमुळे त्रस्त असाल तर तुम्ही तुमचा नंबर बीएसएनएलवर पोर्ट करू शकता.
लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बीएसएनएलमध्ये तुम्हाला अतिशय स्वस्त रिचार्ज प्लान पाहायला मिळणार आहेत. आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या अशा तीन रिचार्ज प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही फक्त २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. २०० रुपयांपेक्षा कमी रकमेच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला बरेच फायदे पाहायला मिळतील. चला तर मग जाणून घेऊया बीएसएनएलच्या या तीन रिचार्ज प्लॅन्सबद्दल.
१०७ रुपयांचा प्रीपेड प्लान
बीएसएनएलचा १०७ रुपयांचा प्लान ३५ दिवसांच्या वैधतेसह येतो. ३५ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये तुम्हाला २०० लोकल आणि एसटीडी कॉलिंग मिनिट्स मिळतात. डेटाबद्दल बोलायचं झाले तर प्लानमध्ये तुम्हाला एकूण ३ जीबी डेटा दिला जाईल.
१५३ रुपयांचा प्रीपेड प्लान
बीएसएनएलच्या १५३ रुपयांच्या प्लानची वैधता २६ दिवसांची आहे. २६ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. तर तुम्हाला फक्त १ जीबी डेटा मिळतो. डेटा लिमिट संपल्यानंतर तुम्ही ४० केबीपीएसच्या स्पीडनं इंटरनेट वापरू शकता.
१९९ रुपयांचा प्रीपेड प्लान
बीएसएनएलचा १९९ रुपयांचा हा प्लान ३० दिवसांच्या पूर्ण वैधतेसह येतो. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा आणि रोज १०० फ्री एसएमएसचा लाभ मिळतो.