Lokmat Money > बिझनेस न्यूज > १ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?

१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?

One State One RRB : देशातील अनेक ग्रामीण बँका १ मे पासून बंद होत आहेत. यामुळे देशातील ग्रामीण बँकांची संख्या ४३ वरून २८ पर्यंत कमी होईल. या बँकामध्ये असणाऱ्या खातेदारांच्या पैशांचं काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 14:35 IST2025-04-30T14:26:49+5:302025-04-30T14:35:37+5:30

One State One RRB : देशातील अनेक ग्रामीण बँका १ मे पासून बंद होत आहेत. यामुळे देशातील ग्रामीण बँकांची संख्या ४३ वरून २८ पर्यंत कमी होईल. या बँकामध्ये असणाऱ्या खातेदारांच्या पैशांचं काय होणार?

these 15 banks will be closed from tomorrow what will happen to your money | १ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?

१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?

One State One RRB : जर तुमचेही गावातील बँकेतबँक खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण देशातील अनेक ग्रामीण बँका १ मे पासून बंद होत आहेत. केंद्र सरकारच्या एक राज्य, एक ग्रामीण बँक धोरणांतर्गत, या बँकांचे इतर बँकांमध्ये विलीनीकरण केले जाईल. यामुळे देशातील ग्रामीण बँकांची संख्या ४३ वरून २८ पर्यंत कमी होईल. सरकारने हा निर्णय घेण्यामागील कारण म्हणजे बँकिंग सेवा मजबूत करणे आणि त्या अधिक प्रभावी करणे. जर तुमचे अशा बँकेत खाते असेल तर तुमच्या पैशांचं काय होणार? असा प्रश्न तुमच्या मनात येणे साहजिक आहे. चला जाणून घेऊया.

उद्यापासून या १५ बँका बंद होणार
सरकारच्या या निर्णयाचा परिणाम तुम्हाला ११ राज्यांमध्ये दिसून येईल. ज्यामध्ये आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि राजस्थान यांचा समावेश आहे. या राज्यांमधील सर्व ग्रामीण बँकांचे विलीनीकरण करून त्या राज्यात एक ग्रामीण बँक तयार केली जाईल.

खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
या निर्णयानंतर ग्राहकांना पूर्वीपेक्षाही चांगल्या सुविधा मिळतील. यामुळे डिजिटल आणि ग्राहक सेवा, पायाभूत सुविधा देखील मजबूत होतील. बँक शाखांच्या संख्येत कोणतीही कपात होणार नाही. जर तुमचेही या बँकांमध्ये खाते असेल तर तुम्हाला काही फरक पडणार नाही, फक्त बँकेचे नाव बदलेल. खाती, कर्जे आणि इतर सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. या बदलानंतर, बँक आपल्या ग्राहकांना नवीन खाते क्रमांक काय आहे हे मॅसेजद्वारे कळवणार आहे. याशिवाय, त्यांना नवीन चेकबुक आणि पासबुक देखील मिळेल.

वाचा - गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

कोणत्या बँकांचा यादीत समावेश?
चैतन्य गोदावरी ग्रामीण बँक, आंध्र प्रगती ग्रामीण बँक, सप्तगिरी ग्रामीण बँक, आंध्र प्रदेश ग्रामीण विकास बँक या आंध्र प्रदेशमध्ये आहे. बडोदा यूपी बँक आर्यवर्त बँक, उत्तर प्रदेशातील पहिली यूपी ग्रामीण बँक. पश्चिम बंगालमध्ये बंगिया ग्रामीण विकास बँक, पश्चिम बंगाल ग्रामीण बँक, उत्तर बंगाल आरआरबी आहे. बिहारमध्ये दक्षिण बिहार ग्रामीण बँक, उत्तर बिहार ग्रामीण बँक आहे. गुजरातमध्ये बडोदा गुजरात ग्रामीण बँक, सौराष्ट्र ग्रामीण बँक आहे. जम्मू आणि काश्मीर ग्रामीण बँक ही जम्मू आणि काश्मीरमधील एक स्थानिक ग्रामीण बँक आहे. यासोबतच कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान यांचाही त्यात समावेश आहे.

Web Title: these 15 banks will be closed from tomorrow what will happen to your money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.