lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > काम समान, पगार मात्र असमान, देशभरात पुरुषांच्या तुलनेत महिलांना मजुरी कमीच; शहरात तफावत कमी

काम समान, पगार मात्र असमान, देशभरात पुरुषांच्या तुलनेत महिलांना मजुरी कमीच; शहरात तफावत कमी

राष्ट्रीय सांख्यिकी सर्वेक्षण कार्यालयाने (एनएसएसओ) जाहीर केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 01:08 PM2023-03-22T13:08:50+5:302023-03-22T13:09:08+5:30

राष्ट्रीय सांख्यिकी सर्वेक्षण कार्यालयाने (एनएसएसओ) जाहीर केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.

The work is equal, the pay is unequal, women are paid less than men across the country; Less variation in the city | काम समान, पगार मात्र असमान, देशभरात पुरुषांच्या तुलनेत महिलांना मजुरी कमीच; शहरात तफावत कमी

काम समान, पगार मात्र असमान, देशभरात पुरुषांच्या तुलनेत महिलांना मजुरी कमीच; शहरात तफावत कमी

मुंबई : ग्रामीण आणि शहरी भारतात समान कामासाठी समान वेतन अपेक्षित असताना पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना अतिशय कमी वेतन दिले जात आहे. सर्वात वाईट म्हणजे, गेल्या दहा वर्षांत ग्रामीण भागात महिलांच्या पगारात आणखी घट झाली असल्याचे केंद्र सरकारच्या अहवालात समोर आले आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी सर्वेक्षण कार्यालयाने (एनएसएसओ) जाहीर केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. हे सर्वेक्षण एनएसएसओने भारतातील महिला आणि पुरुष २०२२ या अहवालाच्या स्वरुपात प्रसिद्ध केले आहे. हे सर्वेक्षण एप्रिल-जून २०२२ दरम्यान झाले. या कालावधीत, ग्रामीण भारतातील ‘महिला वेतन दर’ वेगवेगळ्या राज्यांमध्ये पुरुषांना मिळणाऱ्या वेतनाच्या अर्ध्या ते ९३.७ टक्के इतका होता आणि तो शहरांमध्ये पुरुषांना मिळणाऱ्या वेतनाच्या अर्ध्या ते १००.८ टक्क्यांपर्यंत होता.

अहवालानुसार, बहुतांश राज्यांमध्ये ग्रामीण भागातील वेतनात मोठे अंतर निर्माण झाले आहे. दुसरीकडे, गेल्या दशकात शहरी भागात ही तफावत कमी होताना दिसत आहे. ग्रामीण  भागात महिला कामगारांना मिळत असलेल्या मजुरीत गेल्या काही वर्षांपासून घट होताना पहायला मिळत आहे. त्यामुळे महिलांचे मजुरीचे प्रमाणही कमी झाले आहे.

महिलांच्या कामाला महत्त्व कुठे? 
उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि ओडिशामध्ये महिला ग्रामीण मजुरीचे दर पुरुष कामगारांच्या तुलनेत ७० टक्क्यांहून कमी आहेत. 
हरियाणा, पंजाब, हिमाचल व राजस्थान येथे पुरुष वेतन दर ४०० रुपये प्रतिदिन आहे. या राज्यांमध्ये पुरुषांपेक्षा कमी मात्र इतर राज्यांच्या तुलनेत थोडी अधिक मजुरी महिलांना दिली जाते.

केरळमध्ये मोठी तफावत
शिक्षणात प्रगत असलेल्या केरळमध्ये मजुरीचा दर देशात सर्वाधिक आहे. असे असले तरी तेथे पुरुष आणि महिला यांच्या मजुरीत मोठी तफावत आहे. केरळमध्ये ग्रामीण भागात पुरुषाला ८४२ रुपये मजुरी असता महिलांना ४३४ रुपये मजुरीपोटी दिले जातात.

मजुरी सर्वाधिक कुठे? 
कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये पुरुषांना जास्त मजुरी मिळते आणि महिलांना मात्र कमी मजुरी आहे. याउलट, गुजरात, ओडिशा आणि झारखंडमध्ये सर्वात कमी मजुरीचे दर आहेत, त्यामुळे फरकही कमी आहे.

बिहारमध्ये काय? 
सर्वात कमी मजुरी पुरुषांना छत्तीसगड मिळत असून, ती २८१ रुपये इतकी आहे. याचवेळी महिलांची रुपयांवर बोळवण केली जाते. बिहारमध्ये ३९९ रुपये मजुरी देण्यात येते. 

कुणाला किती मिळते वेतन? 
     ग्रामीण     शहरी 
राज्य     पुरुष    महिला    पुरुष     महिला
केरळ     ८४२    ४३४     ८४६     ४०४ 
तामिळनाडू     ५५६    २९७     ५७६     ३७५ 
आंध्र प्रदेश     ४८५    २८५     ५५८     ४०५ 
उत्तर प्रदेश     ३९६    २४५     ४०२     ३९८ 
आसाम     ३८३    २४३     ४६५     ३१७ 
पश्चिम बंगाल     ३४२    २१९     ३८९     २६७ 
महाराष्ट्र     ३५२    २२६     ४३६     २७४ 
गुजरात     ३०४    २४२     ३९०     ३१२ 

मजूर कशासाठी लागतात? 
     ग्रामीण        शहरी

राज्य     पुरुष    महिला    पुरुष     महिला
शेती     ५१.०     ७५.९    ५.४    ११.१ 
उत्पादन    ७.९    ७.९    २१.५    २४.३ 
बांधकाम     १६.६    ५.३    १२.९    ३.९ 
हॉटेल    १०.६    ३.७    २५.२    १४.८ 
वाहतूक    ५.६    ०.३    १२.५    ४.६ 
इतर सेवा    ७.५    ६.८    २०.७    ४०.७

३९३
रुपये सरासरी मजुरी देशभरातील ग्रामीण भागातील पुरुष कामगारांना असून, महिला कामगारांना मात्र २६५ रुपये मजुरी दिली जाते.

४८३
रुपये सरासरी मजुरी देशभरातील शहरी भागातील पुरुष कामगारांना असून, महिला कामगारांना मात्र ३३३ रुपये मजुरी दिली जाते.

७०%
पुरुषांच्या तुलनेत कमी मजुरी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशातील ग्रामीण महिलांना दिली जाते.

Web Title: The work is equal, the pay is unequal, women are paid less than men across the country; Less variation in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.