एखाद्याचं नशीब कधी पालटेल आणि रातोरात ती व्यक्ती श्रीमंत होईल हे सांगता येत नाही. चीनमधील सर्वात मोठी बॉटलबंद पाण्याची कंपनी नोंगफू स्प्रिंगचे फाऊंडर झोंग शान्शान देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे आता इतकी संपत्ती आहे की ते एकेकाळी ते मुकेश अंबानी यांच्यापेक्षाही श्रीमंत व्यक्ती होते. शान्शान वॅक्सिन आणि हॅपेटाइटिस टेस्ट किट बनवणारी फार्मा कंपनी वानताई बायोलॉजिकल फार्मेंसी इंटरप्रायजेसमध्येही भागीदार आहेत. २०२१ साली ते पहिल्यांदा चर्चेत आले जेव्हा त्यांनी भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते.
कोण आहेत झोंग शान्शान?
१९५४ साली चीनच्या पूर्व भागातील शहर हांग्जो येथे जन्मलेले झोंग शान्शान यांनी चीनच्या सांस्कृतिक क्रांतीच्या काळात शाळा सोडून दिली आणि बांधकामाशी निगडीत कामात गुंतले. १९७० च्या दशकात शान्शान यांनी एका कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु दोन दोन वेळा ते एन्ट्रेंस टेस्ट परीक्षेत पास होऊ शकले नाहीत. त्यानंतर शान्शान यांनी ओपन यूनिवर्सिटीतून त्यांचे पुढील शिक्षण सुरू ठेवले.
काही काळ शान्शान यांनी पत्रकार म्हणून काम केले. १९८८ मध्ये नोकरी सोडल्यानंतर त्यांनी ५ वर्ष झेजियांग डेलीमध्ये एक रिपोर्टर म्हणून काम केले. त्यानंतर चीनी बेट हैनान येथे मशरूम शेतीत नशीब आजमावलं. त्यानंतर झींगा, कासव विकले. या कामात त्यांना फारसं यश मिळालं नाही तेव्हा त्यांनी वहाहा बेवरेजेस कंपनीत सेल्स एजेंट म्हणून काम सुरू केले. त्यानंतर हेल्थकेअर सप्लीमेंट्स विकणेही सुरू केले.
१९९३ साली नशीब पालटलं
१९९३ साली झोंग शान्शान यांना मोठा ब्रेक मिळाला जेव्हा त्यांनी हेल्थकेअर ब्रांड यांगशैंगटँगची स्थापना केली आणि सप्टेंबर १९९६ मध्ये पेय कंपनी नोंगफू स्प्रिंगचा पाया रचला. सप्टेंबर २०२० मध्ये नोंगफू स्प्रिंग एक सार्वजनिक रित्या व्यवसाय करणारी कंपनी बनली. त्यांनी हाँगकाँग स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनी लिस्टेड केली त्यानंतर त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. फोर्ब्स रियल टाइम बिलियनेयर्सच्या लिस्टनुसार, १६ मार्च २०२५ पर्यंत झोंग शान्शान यांची एकूण संपत्ती ५८.८ बिलियन डॉलर आहे. त्यामुळे ते चीनमधील पहिले आणि जगातील २६ वे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.