Lokmat Money > बिझनेस न्यूज > पहिलाच महिना घेऊन आला १५ सुट्ट्या; जानेवारीत बँकांच्या कामांचे आधीच करून ठेवा नियोजन

पहिलाच महिना घेऊन आला १५ सुट्ट्या; जानेवारीत बँकांच्या कामांचे आधीच करून ठेवा नियोजन

भारतीय रिझर्व्ह बँकेने जानेवारी २०२५ मधील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. यात सर्व रविवार, दुसरा व चौथा शनिवार यांसह गुरु गोविंद सिंह जयंती, लोहाडी, मकर संक्रांत आणि पोंगल यांचा समावेश आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 13:21 IST2024-12-31T13:19:31+5:302024-12-31T13:21:08+5:30

भारतीय रिझर्व्ह बँकेने जानेवारी २०२५ मधील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. यात सर्व रविवार, दुसरा व चौथा शनिवार यांसह गुरु गोविंद सिंह जयंती, लोहाडी, मकर संक्रांत आणि पोंगल यांचा समावेश आहे. 

The first month brings 15 holidays; Plan your banking activities in advance in January | पहिलाच महिना घेऊन आला १५ सुट्ट्या; जानेवारीत बँकांच्या कामांचे आधीच करून ठेवा नियोजन

पहिलाच महिना घेऊन आला १५ सुट्ट्या; जानेवारीत बँकांच्या कामांचे आधीच करून ठेवा नियोजन

नवी दिल्ली : विविध सण, उत्सव आणि नियमित साप्ताहिक सुट्या यामुळे जानेवारी २०२५ मध्ये बँका १५ दिवस बंद राहणार आहेत. मात्र यातील काही सण व उत्सव स्थानिक पातळीवरील असल्यामुळे राज्यानुसार सुट्या कमी जास्त होतील.

भारतीय रिझर्व्ह बँकेने जानेवारी २०२५ मधील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. यात सर्व रविवार, दुसरा व चौथा शनिवार यांसह गुरु गोविंद सिंह जयंती, लोहाडी, मकर संक्रांत आणि पोंगल यांचा समावेश आहे. 

दिनांक    सुट्टीचे कारण    कुठे?
१ जानेवारी, बुधवार    नववर्षानिमित्त सुटी    देशभर
२ जानेवारी, गुरुवार    मन्नान जयंती    केरळ
५ जानेवारी    रविवार    देशभर
६ जानेवारी, सोमवार    गुरु गोविंद सिंह जयंती    पंजाब, अन्य राज्यांत
११ जानेवारी    दुसरा शनिवार    देशभर
१२ जानेवारी    रविवार    देशभर
१३ जानेवारी, सोमवार    लोहाडी सण    पंजाब, अन्य राज्यांत
१४ जानेवारी, मंगळवार    मकर संक्रांत, पोंगल    तामिळनाडू, आंध्र प्रदेश
१५ जानेवारी, बुधवार    टुसू पूजा    प. बंगाल व आसाम
१६ जानेवारी, गुरुवार    उज्जवर तिरुनाल    तामिळनाडू
१९ जानेवारी    रविवार    देशभर
२३ जानेवारी, गुरुवार    नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती    अनेक राज्यांत
२५ जानेवारी    चौथा शनिवार    देशभर
२६ जानेवारी    रविवार व प्रजासत्ताक दिन    देशभर
३० जानेवारी, गुरुवार    सोनम लोसार    सिक्किम
 
Web Title: The first month brings 15 holidays; Plan your banking activities in advance in January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक