Lokmat Money > बिझनेस न्यूज > पार्किंग स्पेसचं वर्षभराचं भाडं १ कोटी रुपयांपेक्षा अधिक; परदेशात नाही तर, भारतातीलच आहे हे शहर

पार्किंग स्पेसचं वर्षभराचं भाडं १ कोटी रुपयांपेक्षा अधिक; परदेशात नाही तर, भारतातीलच आहे हे शहर

तुम्ही दिल्ली-मुंबईसारख्या महानगरात रहात असाल किंवा कोणत्या छोट्या शहरात राहत असाल, पार्किंगची समस्या सर्वत्र सारखीच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 08:36 IST2024-12-13T08:36:54+5:302024-12-13T08:36:54+5:30

तुम्ही दिल्ली-मुंबईसारख्या महानगरात रहात असाल किंवा कोणत्या छोट्या शहरात राहत असाल, पार्किंगची समस्या सर्वत्र सारखीच आहे.

The annual rent for a parking space is more than Rs 1 crore this city is not abroad but in India Bengaluru parking space | पार्किंग स्पेसचं वर्षभराचं भाडं १ कोटी रुपयांपेक्षा अधिक; परदेशात नाही तर, भारतातीलच आहे हे शहर

पार्किंग स्पेसचं वर्षभराचं भाडं १ कोटी रुपयांपेक्षा अधिक; परदेशात नाही तर, भारतातीलच आहे हे शहर

तुम्ही दिल्ली-मुंबईसारख्या महानगरात रहात असाल किंवा कोणत्या छोट्या शहरात राहत असाल, पार्किंगची समस्या सर्वत्र सारखीच आहे. बंगळुरूसारख्या महानगरात ही समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे पार्किंग इमारतीचा एक मजला वार्षिक १.१ कोटी रुपयांच्या भाड्यानं घेण्यात आला आहे. ही पार्किंग ची जागा बंगळुरू महानगरपालिकेच्या (BBMP) मालकीची आहे.

काय आहे प्रकरण?

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, बीबीएमपीनं आपल्या चार मजली पार्किंगसाठी निविदा काढली होती. अद्वैत मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडनं सर्वाधिक बोली लावली. त्यामुळे त्यांनी इमारतीचा दुसरा मजला पाच वर्षांसाठी भाड्यानं घेतला. खरं तर, बीबीएमपीच्या चार मजली पार्किंगमध्ये मोटार वाहनं कमी पार्क केली गेली होती. कंत्राटदाराच्या म्हणण्यानुसार, पार्किंगची बहुतांश जागा रिकामी होती. त्यामुळे पार्किंग चालवणाऱ्या अलक मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं दुसऱ्या मजल्यावरील अन्य काही कामासाठी बीबीएमपीकडे परवानगी मागितली. खरं तर कंपनीला व्हॅक्यूम क्लीनिंग आणि ऑटोमोबाईल सेवा चालवायची होती.

पालिकेनं काय केलं?

त्या कंपनीला परवानगी देण्याऐवजी बीबीएमपीनं त्यासाठी स्वतंत्र निविदा काढली. अलाइक मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडसह दोन कंपन्यांनी बोली लावली. परंतु अद्वैत मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडने सर्वाधिक १.१ कोटी रुपयांची बोली लावली. बीबीएमपी प्रशासक उमाशंकर एसआर यांनी दुसरा मजला अद्वैत मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडला पाच वर्षांसाठी भाड्यानं देण्यास मान्यता दिली.

कंपनीला तोटा होत होता का?

यापूर्वी तळघर, तळ, पहिला आणि दुसरा मजला अॅलिक मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडकडे होता. कंपनीला २०२३ पासून पाच वर्षांसाठी पार्किंग चालविण्याचे कंत्राट देण्यात आले होते. या पार्किंगमध्ये २९२ चारचाकी आणि २५२ दुचाकी वाहने उभी राहू शकतील. केवळ ४० टक्के जागा वापरली जात असल्यानं तोटा होत असल्याचं कंपनीनं म्हटलं. त्यामुळे कंपनीनं ६ मार्च रोजी बीबीएमपीला पत्र लिहून दुसरा मजला इतर कामांसाठी देण्याची विनंती केली.

सर्वाधिक भाडं

बीबीएमपीला अलाइक मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडकडून तीन मजल्यांसाठी वार्षिक ७५ लाख रुपये भाडं मिळत आहे. आता अद्वैत मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून पालिकेला वार्षिक १.१ कोटी रुपये मिळणार आहेत. यामुळे बीबीएमपीच्या उत्पन्नात वाढ होईल. बीबीएमपीला आशा आहे की यामुळे पार्किंगची समस्या देखील कमी होईल. ही नवी व्यवस्था कितपत परिणामकारक ठरते हे पाहावं लागेल.

Web Title: The annual rent for a parking space is more than Rs 1 crore this city is not abroad but in India Bengaluru parking space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.