Jobs for Freshers in Infosys 2025: एकीकडे, एआयच्या (AI) युगात, आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात होत आहे. त्याच वेळी, अशी एक कंपनी देखील आहे जी येत्या काळात हजारो पदवीधरांना नोकरीवर ठेवण्याची योजना आखत आहे. आपण जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी इन्फोसिसबद्दल (Infosys) बोलत आहोत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांनी यावर्षी सुमारे २०,००० कॉलेज ग्रॅज्युएट्सना नोकरीवर ठेवण्याच्या कंपनीच्या योजनेची पुष्टी केली.
AI आणि वर्कफोर्सवर फोकस
वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १७,००० हून अधिक लोकांना नोकऱ्या देण्यात आल्या. त्याचबरोबर यावर्षी सुमारे २० हजार महाविद्यालयीन पदवीधरांना कंपनीत सामावून घेण्याची योजना आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससोबतच कंपनी सध्या आपलं वर्कफोर्स वाढवण्यावरही भर देत आहे. "इन्फोसिसनं दोन्ही क्षेत्रातील गुंतवणुकीत स्वत:ला पुढे ठेवलं आहे. इन्फोसिसमध्ये आतापर्यंत सुमारे २,७५,००० कर्मचाऱ्यांना एआय आणि डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे," अशी माहिती कंपनीच्या सीईओंनी दिली.
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत
TCS मध्ये कर्मचारी कपात
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मधील १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर इन्फोसिसमध्ये अलीकडेच भरतीची घोषणा करण्यात आली आहे. टीसीएसमध्ये होणारी ही कर्मचारी कपात देशातील आयटी क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी कपात आहे.
२०२५-२६ या आर्थिक वर्षात, देशातील इतर कोणत्याही आयटी कंपनीने इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केलेली नाही. दरम्यान, आयटी कंपन्यांची सर्वोच्च संस्था असलेल्या नॅसकॉमनं अलिकडेच आयटी क्षेत्रात अधिक नोकरकपातीचे संकेत दिलेत. भारत आणि परदेशातील ग्राहकांच्या वाढत्या आणि बदलत्या मागणी आणि नाविन्यपूर्णतेमुळे हे घडेल असं नॅसकॉमचं म्हणणं आहे.